esakal | कोयनेला जागतिक पर्यटन केंद्र बनविणार; मुख्य अभियंता हणमंत गुणालेंची ग्वाही
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Latest Marathi News

राज्याच्या जलसंपदा विभागाबरोबरच कोयना प्रकल्पाच्या मुख्य अभियंता पदावर हणमंत गुणाले यांची अधीक्षक अभियंता या पदावरून पदोन्नतीने निवड झाली आहे.

कोयनेला जागतिक पर्यटन केंद्र बनविणार; मुख्य अभियंता हणमंत गुणालेंची ग्वाही

sakal_logo
By
विजय लाड

कोयनानगर (जि. सातारा) : राज्यात जलसंपदा विभागाचे अनेक बहुउद्देशीय असणाऱ्या प्रकल्पाचे काम अर्धवट राहिले आहे. या अर्धवट अवस्थेत असलेल्या प्रकल्पाचे काम गतीने पूर्ण करण्यावर आपला भर असणार आहे. शिराळा-वाळवा तालुक्यात हरितक्रांती करणाऱ्या वाकुर्डी उपसा जलसिंचन या बहुउद्देशीय योजनेबरोबरच कोल्हापूर जिल्ह्यातील अर्धवट असलेल्या योजना या वर्षभरात मार्गी लावून त्याची घळभरणी करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा तथा कोयना प्रकल्पाचे नूतन मुख्य अभियंता हणमंत गुणाले यांनी केले.

राज्याच्या जलसंपदा विभागाबरोबरच कोयना प्रकल्पाच्या मुख्य अभियंता पदावर हणमंत गुणाले यांची अधीक्षक अभियंता या पदावरून पदोन्नतीने निवड झाली आहे. वर्षभरापासून जलसंपदा खात्यातील बढती प्रक्रियेला ब्रेक लागला होता. मुख्य अभियंता या पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर ते 'सकाळ' प्रतिनिधीशी बोलत होते. मुख्य अभियंता गुणाले पुढे म्हणाले, टेंभु, ताकारी, म्हैसाळ ही दुष्काळी भागासाठी वरदान असणारी कामे वेगाने सुरु आहेत. वेळेत ही कामे पूर्ण करण्याची मुदत शासनाने घातल्याने ती कामे पूर्ण करण्यसाठी शासन स्तरावर गतीने प्रयत्न सुरु आहेत. या योजनेमुळे दुष्काळी भागाबरोबर खानापूर, कडेगाव, तासगाव, मिरज पूर्व, कवठेमहांकाळ आणि जत तालुक्यातील अनेक गावांना पाणी मिळाल्याने बागायती क्षेत्र कायम राहणार आहे.

पाटणात नुकसान भरपाईपासून दहा हजार शेतकरी वंचित; सरकारकडून तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार ​  

या योजनेचे कार्यक्षेत्र सातारा, सांगली, सोलापूर या तीन जिल्ह्यांतील गावांचा समावेश होत असल्याने पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. दुष्काळमुक्त जनता याच अजेंड्यावर माझे प्रामुख्याने लक्ष असणार असून या योजनेपासून वंचित असणारा तीन जिल्ह्यातील भागांचा या योजनेत समाविष्ट करून येत्या वर्षभरात ही कामे पूर्ण करुन योजना चालू करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. कोयना प्रकल्प महाराष्ट्राचे शक्तिपीठ आहे. कोयना धरणाच्या डाव्या पायथ्या शेजारी पाच वर्षांपासून बंद पडलेले 80 मेगावॅट क्षमतेच्या वीज गृहाच्या कामाला सुधारित प्रशासकीय मान्यता घेवून हे काम येत्या 3 महिन्यात सुरु करुन कोयना व वीज ही ओळख गडद करणार आहे.

थोडं फार होणारच! उदयनराजेंनी गृहराज्यमंत्र्यांच्या भेटीनंतर सोडले मौन

गृहराज्यमंत्री देसाईंच्या संकल्पनेतून विकास

राज्य शासनाने कोयना पर्यटनाचा आराखडा तयार करायला घेतला आहे. जलसंपदा विभाग, वन विभाग व पर्यटन विभाग या खात्यांचा यामध्ये समावेश आहे. पर्यटक आकर्षित करणारे राज्यातील मोठे पर्यटन स्थळ कोयनानगर येथे विकसित करण्यात येत आहे. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, जलसंपदामंत्री जयंत पाटील व पाटण तालुक्याचे लोकप्रतिनिधी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी पर्यटन विकास होत आहे. ऊर्जा उद्यान पार्क, वॉटर पार्क, पोलीस प्रशिक्षण केंद्र या बरोबर नेहरू उद्यानासारखे अजून एक उद्यान या ठिकाणी करण्याचे प्रस्तावित आहे. अल्पावधीतच कोयना हे जागतिक पर्यटन केंद्र म्हणून ओळखले जाईल, असा विश्वास  हणमंत गुणाले यांनी व्यक्त केला.

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथेक्लिक करा

संपादन : बाळकृष्ण मधाळे