प्रकल्पग्रस्तांनी साथ दिली तर धरणे मार्गी लागतील; सभापती रामराजेंची स्पष्टोक्ती

Satara Latest Marathi News Satara News
Satara Latest Marathi News Satara News

मसूर (जि. सातारा) : त्यागातूनच पाणी प्रकल्प मार्गी लागतात. लाभक्षेत्रधारक व प्रकल्पग्रस्तांनी साथ दिली तर धरणे मार्गी लागतील, अशी स्पष्टोक्ती विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केली. 

पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या खोडजाईवाडी (ता. कऱ्हाड) येथील साठवण तलावाचे भूसंपादन निधीचे वितरण, विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्‌घाटन, पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचा नागरी सत्कार कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. खासदार श्रीनिवास पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, माजी आयुक्त प्रभाकर देशमुख, सभापती मानसिंगराव जगदाळे, राष्ट्रवादीचे कऱ्हाड उत्तरचे अध्यक्ष देवराज पाटील, सभापती प्रणव ताटे, माजी विभागीय उपायुक्त तानाजीराव साळुंखे, माई चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा संगीता साळुंखे, दशराज पाटील उपस्थित होते. 

मंत्री पाटील म्हणाले, "1972 ला खोडजाईवाडीला पाझर तलावाची संकल्पना आली. शासनाच्या निकषानुसार 100 ते 250 हेक्‍टर क्षेत्रापर्यंत साठवण तलाव झाला. मागील सरकारने पश्‍चिम महाराष्ट्रातल्या योजनांना निकष लावून नुकसान केले. विधानसभा डोळ्यासमोर ठेवत हणबरवाडी-धनगरवाडी पाणीयोजना कमी खर्चात लवकर व्हावी, यासाठी योजनेचे चॅनेलच बदलले. योजनाही मार्गी लावली नाही.'' श्रीनिवास पाटील, मानसिंगराव जगदाळे, संगीता साळुंखे, अजितराव पाटील, शहाजी क्षीरसागर, डॉ. विजय साळुंखे, बजरंग कोकाटे यांची भाषणे झाली. रवींद्र मांडवे यांनी स्वागत केले. सुनील साळुंखे यांनी सूत्रसंचालन केले. सागर गोडसे यांनी आभार मानले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com