साखर कारखान्यांच्या समस्यांबाबत प्रस्ताव द्या; सहकारमंत्र्यांच्या शेती अधिकाऱ्यांना सूचना

हेमंत पवार
Saturday, 23 January 2021

साखर कारखान्यांच्या शेती अधिकाऱ्यांनी ऊस तोडणी, वाहतूक खर्च व कमिशन सर्व कारखान्यांमध्ये समांतर राहील याकडे लक्ष द्यावे, अशा सूचना सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केल्या.

कऱ्हाड (जि. सातारा) : साखर कारखान्यांच्या शेती अधिकाऱ्यांनी ऊस तोडणी, वाहतूक खर्च व कमिशन सर्व कारखान्यांमध्ये समांतर राहील याकडे लक्ष द्यावे. ऊस तोडणी वाहतूक खर्चात बचत करून शेतकऱ्यांना जास्तीचा दर देता येईल यासाठी कारखाना व्यवस्थापनात आवश्‍यक ती माहिती द्यावी, अशा सूचना सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी नुकत्याच शेती अधिकाऱ्यांना केल्या. शेती अधिकाऱ्यांनी कारखान्यांसंदर्भात मांडलेल्या प्रश्नांवर शासन निश्‍चित विचार करेल, त्यासाठी आवश्‍यक प्रस्ताव सादर करावा, असेही सूचीत केले. 

सहकारमंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील साखर आयुक्तालयात कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील चालू गाळप हंगामाबाबत साखर कारखान्यांच्या शेती अधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली. त्यामध्ये ते बोलत होते. आयुक्तालयाचे प्रशासन संचालक उत्तम इंदलकर, विकास सहसंचालक पांडुरंग शेळके, उपपदार्थ सहसंचालक डॉ. संजयकुमार भोसले व साखर आयुक्तालयातील अधिकारी उपस्थित होते. मंत्री पाटील यांनी यंत्राद्वारे ऊस तोडणी, अंगद गाडी, बायडिंग मटेरियल, ऊस तोडणी व वाहतूक खर्च, मुकादम कमिशन या मुद्यांवर चर्चा केली. त्यावेळी त्यांनी शेती अधिकाऱ्यांनी ऊस तोडणी, वाहतूक खर्च व कमिशन सर्व कारखान्यांमध्ये समांतर राहील याकडे लक्ष द्यावे. 

निवडणुकीसाठी 100 कोटी खर्च करू, तुम्हाला मंत्रीपद देऊ; भाजपची राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याला ऑफर

अडचणी व प्रश्न कारखाना व्यवस्थापनाच्या निदर्शनास आणून द्यावेत. ऊस तोडणी वाहतूक खर्चात बचत होऊन शेतकऱ्यांना जास्तीचा दर मिळावा, यासाठी कारखाना व्यवस्थापनात आवश्‍यक ती माहिती वेळोवेळी द्यावी. चालू गळीत हंगामात ऊस शिल्लक राहणार नाही त्यादृष्टीने शेती अधिकाऱ्यांनी नियोजन करावे, अशा सूचना केल्या. पुढील वर्षीच्या हंगामात देखील उसाचे उत्पादन जास्त राहणार असल्याने शेती विभागाने दक्ष राहून कार्यवाही करावी, असे सांगून शेती अधिकाऱ्यांनी साखर कारखान्यांशी संबंधित मांडलेल्या प्रश्नांवर शासन निश्‍चित विचार करेल, त्यासाठी आवश्‍यक प्रस्ताव सादर करावा, असेही त्यांनी यावेळी शेती अधिकाऱ्यांना सूचीत केले. 

कालगाव, तारगावातील शेतकऱ्यांना न्याय द्या; रेल्वे महाव्यवस्थापकांना साकडे

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara News Minister Balasaheb Patil Meeting With Farmer Regarding Sugar Factories