esakal | 'शुभमंगल सावधान'साठी आता फक्त 50 जणांचीच उपस्थिती; जिल्ह्यात नवी नियमावली जाहीर
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Latest Marathi News

लग्न समारंभात होणारी गर्दी आणि वाढणारी कोरोनाची रुग्णसंख्या लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी आजपासून लग्न समारंभासाठी नवी नियमावली लागू केली आहे.

'शुभमंगल सावधान'साठी आता फक्त 50 जणांचीच उपस्थिती; जिल्ह्यात नवी नियमावली जाहीर

sakal_logo
By
उमेश बांबरे

सातारा : जिल्ह्यातील कोरोना विषाणू संशयित अथवा संक्रमिक रुग्णसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी लग्न समारंभाच्या कार्यात जास्तीत जास्त 50 व्यक्तींनाच (भटजी, वाजंत्री, स्वयंपाकी, वाढप्यांसह) उपस्थित राहण्याबाबत परवानगी राहील. लग्न कार्याच्या ठिकाणच्या पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्याचा ना हरकत परवाना तसेच तहसीलदार यांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक राहील. फक्त मंगल कार्यालयात (हॉलमध्ये) सनई-वाद्यास परवानगी राहील. कार्यालयाच्या बाहेरील परिसरात कोणत्याही प्रकारचे बॅन्जो-बॅंड, डिजे अथवा फटाके वाजविण्यास पूर्णपणे मनाई राहील, असे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आज जारी केले आहेत. 

लग्न समारंभात होणारी गर्दी आणि वाढणारी कोरोनाची रुग्णसंख्या लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी आजपासून लग्न समारंभासाठी नवी नियमावली लागू केली आहे. यामध्ये समारंभात वधू व वर या दोन्ही पक्षांकडील सर्व नागरिकांना पूर्ण वेळ मास्क वापरणे व सोशल डिस्टन्सिंग पाळणे बंधनकारक राहील. मंगल कार्यालय व्यवस्थापनाने लग्न कार्यालयात पुरेशा प्रमाणात सॅनिटायझर उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आजारी व्यक्ती (मधुमेह, रक्तदाब, श्वसनाचे विकार) व्यक्तीस लग्न कार्यक्रमात सहभागी होण्यास मनाई असेल. 

महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या आखाड्यात खटावातील मल्ल ठोकणार शड्डू

तथापि, रक्ताच्या नात्यातील आजी व आजोबा आदींना उपस्थित राहण्यास परवानगी राहील. हॉटेल, रिसॉर्ट, लॉन्स, मंगल कार्यालये आदी ठिकाणी आयोजित कार्यक्रमात कोविड-19 च्या अनुषंगाने निर्गमित करण्यात आलेल्या आदेशाचा भंग केल्यास संबंधित व्यवस्थापनाकडून प्रथमवेळी 25 हजार रुपये दंड तसेच दुसऱ्या वेळी भंग झाल्यास एक लाख व फौजदारी कारवाई करण्यात येईल. संबंधित कार्यक्रम आयोजकांकडून 10 हजार रुपये दंड व फौजदारी कारवाई केली जाईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात म्हटले आहे. 

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संपादन : बाळकृष्ण मधाळे

loading image
go to top