शासन अनुदानातून बांबूची लागवड करा; भाजपच्या पटेलांचे शेतकऱ्यांना आवाहन

Satara Latest Marathi News Satara News
Satara Latest Marathi News Satara News

म्हसवड (जि. सातारा) : दिवसेंदिवस प्रदूषण वाढत आहे. नैसर्गिक तापमानात बदल घडून निसर्गाचे संतुलन बिघडत चालले आहे. हे प्रदूषण टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी शासनाच्या अनुदानातून बांबूची लागवड करावी, असे आवाहन भाजपचे नेते पाशा पटेल यांनी पत्रकार परिषदेत केले.
 
या वेळी माणदेशी फाउंडेशनच्या अध्यक्षा चेतना सिन्हा, विजय सिन्हा उपस्थित होते. माण तालुका दुष्काळी आहे. या तालुक्‍यात उन्हाची तीव्रता अधिक असते. कमी पाऊस पडतो. त्या मागील कारण वातावरणातील प्रदुषणात दिवसेंदिवस होत चाललेली चिंताजनक वाढ हेच आहे. या भागातील हवेतील तापमान व प्रदुषणाची पातळी कमी करून वातावरणाचा समतोल राखण्यासाठी या भागात मोठे असलेले जिराईत व पडीकही क्षेत्रात पाणी उपलब्ध असो वा नसो बांबूची यशस्वीपणे लागवड करण्यास योग्य व शेतकऱ्यांच्या उत्पन्नाच्या दृष्टीने खूपच फायद्याचे आहे. 

बांबूपासून फर्निचर, टूथ ब्रश, कपडे, इथेनॉल, सीएनजी गॅस इंधन तसेच तांदूळ, लोणचे, स्वादिष्ट व आरोग्यास पोषक बिस्किट इत्यादी खाद्यपदार्थ असे सुमारे एक हजार आठशे विविध वस्तू तयार करण्याचे प्रकल्प सुरू केलेले आहेत. एकरी किमान एक लाखापर्यंत खात्रीशीर उत्पन्न मिळत आहे, अशी माहिती त्यांनी दिली. निसर्गाचे संतुलन राखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने बांबू लागवड करण्यासाठी प्रोत्साहनपर अनुदान योजना राबिलेली आहे. केंद्र सरकारच्या योजनेतून प्रति रोप लागवडीस 120 रुपये व अटल बांबू योजनेंतर्गत एका रोपास 27 रुपये लागवडीसाठी अनुदान देत आहे. मनरेगामधूनही बांबू लागवड करण्यास सरकारने मंजुरी दिलेली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. 

बल्कोवा' व "टुल्डा' या जाती माण तालुक्‍यातील हवामानात वाढीस पोषक आहेत. या जातीची टिश्‍यू कल्चरने तयार केलेली रोपे उपलब्ध करून देण्यासाठी नऊ कोटी रुपये खर्च करून लातूरला नर्सरी उभारली आहे. 
-पाशा पटेल, नेते, भाजप 

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com