कोयनेत ब्रिटिश राजवटीतील डाकबंगल्याचे कोंडवाड्यात रूपांतर; शासनाच्या दुर्लक्षाने बंगल्याची पडझड

Satara Latest Marathi News
Satara Latest Marathi News

कोयनानगर (जि. सातारा) : कोयना विभागातील मेंढेघर (कदमवाडी) येथील डाकबंगल्याची शासनाच्या अक्षम्य दुर्लक्षपणामुळे दुरवस्था झाली आहे. शासनाने कोणतीच डागडुजी न केल्यामुळे ब्रिटिशकालीन असणारा हा डाकबंगला मोडकळीस येऊन त्याचे रूपांतर कोंडवाड्यात झाले आहे. 

ब्रिटिश राजवट संपल्यावर हा डाकबंगला शासनाच्या बांधकाम विभागाच्या ताब्यात आला. या विश्रामगृहाची देखभाल व दुरुस्ती बांधकाम विभाग करते. 11 डिसेंबर 1967 रोजी कोयना खोऱ्यात झालेल्या विनाशकारी भूकंपात ही वास्तू नसती तर अनेकांचे संसार उभे राहू शकले नसते. लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी या डाकबंगल्यातच आपला मुक्काम ठोकून बेचिराख झालेल्या भूकंपग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न हातावेगळा केला होता. दिवसरात्र त्यांनी परिश्रम करून भूकंप पुनर्वसनाच्या कामाला झोकून दिले होते.

भूकंपग्रस्तांना दिली जाणारी सर्व शासकीय मदत या डाकबंगल्यातून वाटप केली जात असल्याने या बंगल्याला मदत पुनर्वसन केंद्र हे नाव पडले होते. कोयना पर्यटन क्षेत्रातील हुंबरळी हे ठिकाण पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित झाल्यामुळे सगळ्यांचा ओढा तिकडे असल्याने शासकीयस्तरावर हे विश्रामगृह अडगळीचे ठिकाण बनले. या विश्रामगृहाची देखभाल व दुरुस्ती करायला बांधकाम विभागाला विसर पडल्याने हे विश्रामगृह पूर्णपणे मोडकळीस आले आहे. शासनाची कोणतीही व्यवस्था या ठिकाणी नसल्याने सध्या हे विश्रामगृह पाळीव जनावरांचा कोंडवाडा झालेला आहे.

लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे नातू शंभूराज देसाई हे राज्य मंत्रिमंडळात वजनदार मंत्री आहेत. बाळासाहेबांची स्मृती जतन करणारा हा डाकबंगला विकसित करावा, त्याचबरोबर या निसर्गरम्य परिसराचा समावेश शासन करत असलेल्या कोयना पर्यटन आराखड्यात करून हा परिसर विकसित करून लोकनेत्यांना अभिप्रेत असणारी खरी "कोयना-दौलत'या ठिकाणी साकारावी, अशी अपेक्षा कोयना विभागातील जनतेतून व्यक्त होत आहे. 

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथेक्लिक करा

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com