Satara Latest Marathi News Satara News
Satara Latest Marathi News Satara News

महागाईचा भडका! पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात सेना आक्रमक; कऱ्हाड, वडूजात जोरदार घोषणाबाजी

कऱ्हाड (जि. सातारा) : केंद्र सरकारने केलेल्या पेट्रोल, डिझेल व गॅसच्या दरवाढीविरोधात शिवसेनेच्या वतीने येथील तहसील कार्यालयसमोर आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत नायब तहसीलदार आनंदराव देवकर यांना निवेदन देण्यात आले. 

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख जयवंत शेलार म्हणाले, "मुख्यमंत्री व शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेप्रमाणे पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढी विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. केंद्रात आलेले सरकार सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावून असा विश्‍वास देऊन सत्तेवर आले. मात्र, सत्तेवर आल्यापासून भाजप सरकारने डिझेल, पेट्रोल व घरगुती गॅसची दरवाढ कमी न केल्यास राज्यात शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल. नितीन काशीद यांनी मनोगत व्यक्त केले. उपजिल्हाप्रमुख रामभाऊ रैनाक, रवींद्र पाटील, तालुकाप्रमुख नितीन काशीद, शशिकांत हापसे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख अनिता जाधव, शिवसेना ग्राहक संरक्षण जिल्हाप्रमुख राजेंद्र माने, काकासाहेब जाधव, शहर प्रमुख शशिराज करपे, दशरथ धोत्रे, पोपट कांबळे, साजिद मुजावर, ऋषिकेश महाडिक, सुरेश पाटील, सुनील संकपाळ यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. 

वडूज : महागाई कमी करण्याचे आश्वासन देत, सबका साथ सबका विकासचा नारा देत केंद्रात सत्तेत आलेल्या भाजपप्रणित सरकारने महागाईचा कमालीचा उच्चांक गाठला आहे. त्याचा निषेध खटाव तालुका शिवसेनेच्या वतीने मोर्चा काढून करण्यात आला. महागाईचा निषेध करण्यासाठी तालुका शिवसेनेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. मोर्चात माण, कोरेगाव मतदार संघातील शिवसेनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. तहसीलदार किरण जमदाडे यांना निवेदन देण्यात आले. 

कार्यकर्त्यांनी तहसीलदार कार्यालयाकडे घोषणाबाजी करीत हा मोर्चा काढला. केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल, गॅसची दरवाढ केल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक बजेट कोलमडून गेले आहे. पेट्रोल दरवाढीबाबत शंभरी गाठण्याची घाई केंद्र सरकारला झाली आहे. विकासकामासाठी ज्यांनी पक्ष बदलून सामान्यांचा विश्वास तोडला आहे. ते खासदार, आमदार मूग गिळून गप्प आहेत. त्यांना आता जनताच रस्त्यावर उतरून जाब विचारेल, असे मत या वेळी मान्यवरांनी व्यक्त केले. 

मोर्चात कोरेगाव मतदार संघाचे तालुकाप्रमुख दिनेश देवकर, खटाव तालुका प्रमुख युवराज पाटील, महिला तालुका प्रमुख सुमित्रा शेडगे, ज्येष्ठ कार्यकर्ते मुगुटराव कदम, राणी काळे, उपतालुकाप्रमुख बाळासाहेब जाधव, अमीन आगा, रंग कामगार सेनेचे संजय घोरपडे, सुशांत पार्लेकर, आबासाहेब भोसले, महेश गोडसे, किशोर गोडसे , राघू जाधव, अजित पाटेकर, अशोक देशमुख, कनय्या आगाशे, सचिन कुंभार, रामभाऊ लावंड, राहुल कुंभार आदी सहभागी झाले होते. या वेळी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथेक्लिक करा

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com