esakal | 'सलून व्यवसाय लॉकडाउनमधून वगळा, अन्यथा राज्यात जेल भरो आंदोलन'
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Latest Marathi News

राज्यातील सलून व पार्लर व्यवसाय लॉकडाऊनमधून वगळून येत्या तीन चार दिवसात सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी नाभिक संघटनेने केली आहे.

'सलून व्यवसाय लॉकडाउनमधून वगळा, अन्यथा राज्यात जेल भरो आंदोलन'

sakal_logo
By
उमेश बांबरे

सातारा : राज्यातील सलून व पार्लर व्यवसाय लॉकडाऊनमधून वगळून येत्या तीन चार दिवसात सुरू करण्यास परवानगी द्यावी, अन्यथा 12 एप्रिलपासून राज्यातील सर्व सलून व्यवसाय सुरू केले जातील. व्यावसायिकांवर पोलिसांनी कारवाई केल्यास नाभिक व्यावसायिक रस्त्यावर उतरून जेल भरो आंदोलन करेल, असा इशारा स्वाभिमानी नाभिक संघटनेचे राज्य अध्यक्ष शंकरराव गायकवाड यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिले आहे. 

यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात श्री. गायकवाड यांनी म्हटले की, शासनाने दिलेल्या आदेशानुसार सलुन व्यवसायिकांनी सहकार्य करत व्यवसाय बंद ठेवले आहेत. मात्र, शासनाने प्रत्येक कारागीरास त्याच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी 15 ते 20 हजार रूपये प्रतिमहिना द्यावेत. शासनाने सर्व सलुन व्यवसायिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याचा आदेश काढला आहे. मात्र, अद्याप कारागीरांना लस दिलेले नाही. वयाचा निकष न लावता सर्व सलुनमधील कारागीरांना तातडीने कोरोना लस द्यावी. तसेच सलून व पार्लर व्यवसाय लॉकडाऊनमधून वगळून येत्या तीन ते चार दिवसांत शासनाने हा व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी. 

शंभू महादेवाची चैत्री यात्रा सलग दुसऱ्या वर्षी रद्द; शिंगणापुरात प्रांताधिकाऱ्यांच्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय

या मागण्यांची दखल घेऊन शासनाने त्वरित आदेश काढावेत, अन्यथा 13 एप्रिलपासून राज्यातील सर्व सलुन व्यवसाय सुरू केले जातील. त्यानंतर सूलन व्यावसायिकांवर पोलिसांनी कारवाई केल्यास नाभिक व्यवसायिक रस्त्यावर उतरून जेल भरो आंदोलन करतील. त्यास संपूर्णपणे मुख्यमंत्री, गृहमंत्री व आरोग्यमंत्री जबाबदार राहितील. जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देताना श्री. गायकवाड यांच्या समवेत राज्य सरचिटणीस मंगेश काशीद, जिल्हाध्यक्ष अधिकराव चव्हाण, पांडुरंग चव्हाण, राज्य सदस्य रामभाऊ पवार, सातारा तालुकाध्यक्ष जगन्नाथ पवार, प्रताप भोसले, चंद्रकांत संकपाळ, संकेत निकम, धनाजी काशीद, प्रशांत जाधव, आदी उपस्थित होते. 

पुण्याहून साता-याला निघालात, थांबा! खंबाटकी घाटात झालाय माेठा अपघात

प्रेमीयुगुलांनो! तुम्हाला लुटणारी टोळी पोलिसांनी केली गजाआड; सोलापूर, बारामतीतील सहा जणांना अटक

संपादन : बाळकृष्ण मधाळे

loading image
go to top