esakal | 'राष्ट्रवादीची ध्येय-धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोचवण्यासाठी प्रत्येक गावात युवकांची फळी निर्माण करणार'

बोलून बातमी शोधा

Satara Latest Marathi Political News}

भाडळे खोरे हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला आहे आणि तो अबाधित राहील, अशी ग्वाही आमदार शशिकांत शिंदे यांनी दिली.

'राष्ट्रवादीची ध्येय-धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोचवण्यासाठी प्रत्येक गावात युवकांची फळी निर्माण करणार'
sakal_logo
By
राजेंद्र वाघ

कोरेगाव (जि. सातारा) : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माध्यमातून युवकांना ताकद देऊन गावोगावी राष्ट्रवादीच्या युवकांची फळी निर्माण करणार असल्याचे आमदार शशिकांत शिंदे यांनी सांगितले. 

जांब खुर्द (ता. कोरेगाव) येथे आयोजिलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात गावातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळी आमदार शिंदे बोलत होते. कार्यक्रमास बाळासाहेब सोळसकर, शिवाजीराव महाडिक, राजाभाऊ जगदाळे, अरुण माने, भगवानराव जाधव, तानाजीराव मदने, श्रीमंत झांजुर्णे, डॉ. निवृत्ती होळ, प्रताप कुमुकले, घनश्‍याम शिंदे, जितेंद्र जगदाळे, पांडुरंग भोसले, डॉ. गणेश होळ, सुरेखा पाटील, प्रतिभा बर्गे, भास्कर कदम, राहुल साबळे, अमोल राशीनकर, चरण मोहिते आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

हे पण वाचा- सारथी बंद करण्यास उपमुख्यमंत्रीच जबाबदार; सेनेच्या नेत्याची अजित पवारांवर सडकून टीका

आमदार शिंदे म्हणाले, "भाडळे पंचक्रोशी व भाडळे खोरे हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला आहे आणि तो अबाधित राहील. या भागातील जनतेवर असलेले माझे प्रेम यापुढेही कायम राहील. भाडळे खोऱ्यातील प्रत्येक गाव आणि वाडीवस्तीच्या सर्वांगीण विकासासाठी मी सर्वतोपरी सहकार्य करणार आहे. विविध शासकीय योजना तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसची ध्येय-धोरणे सर्वसामान्य घटकांपर्यंत पोचवण्यासाठी राष्ट्रवादीच्या माध्यमातून प्रत्येक गावात युवकांची फळी निर्माण करण्यावर भर देणार आहे.''

हे ही वाचा- आसाम निवडणुकीसाठी छाननी समितीच्या अध्यक्षपदी पृथ्वीराज चव्हाण 

याप्रसंगी जांब खुर्द येथील माजी उपसरपंच व भाजपचे कार्यकर्ते दत्तात्रय जाधव, राहुल जाधव, विजय जाधव, विकास जाधव, विशाल जाधव, सूरज जाधव आदींनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्याचबरोबर मध्वापूरवाडी, शेंदूरजणे, भोसे, नागेवाडी, सोळशी येथील नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा सत्कारही या वेळी झाला. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे