Gram Panchayat Election : खंडाळा तालुक्यात 698 उमेदवार अजमावणार नशीब!

Satara Latest Marathi News Satara Politics News
Satara Latest Marathi News Satara Politics News

लोणंद (जि. सातारा) : खंडाळा तालुक्यात एकूण 63 पैकी 50 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी उद्या (ता. 15) मतदान होत आहे. 138 मतदान केंद्रांवर 66 हजार 370 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. दरम्यान, मतदान प्रक्रियेची प्रशासनाकडून सर्व तयारी करून सर्वच मतदान केंद्रांवर सुरक्षिततेचीही काळजी घेण्यात आली असल्याची माहिती खंडाळ्याचे तहसीलदार तथा निवडणूक अधिकारी दशरथ काळे यांनी दिली. 

दरम्यान, तालुक्यातील मतदारांनी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी लोकशाही मार्गाने शांततेत मतदान करून आपले कर्तव्य बजावण्याचे आवाहनही तहसीलदार श्री. काळे यांनी केले आहे. खंडाळा तालुक्यातील 57 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया जाहीर झाली होती. त्यामध्ये पळशी, कराडवाडी, वाण्याचीवाडी, लिंबाचीवाडी, हरळी, कान्हवडी, घाडगेवाडी या सात ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. विविध ग्रामपंचायतीत 131 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. उरलेल्या 50 ग्रामपंचायतींच्या 330 जागासाठी 698 उमेदवार निवडणूक रिंगणात आपले नशिब आजमवत आहेत. 50 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी निवडणूक निरीक्षक म्हणून उपजिल्हाधिकारी, निवडणूक अधिकारी, सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून दोन नायब तहसीलदार, दोन अव्वल कारकुन, 17 लिपिक, 20 कोतवाल, 17 तलाठी, 21 ग्रामसेवक, 21 निवडणूक निर्णय अधिकारी, 42 सहाय्यक निवडणूक अधिकारी,138 मतदान केंद्रावर प्रत्येकी 6 कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. 

त्याचबरोबर तीन पोलिस निरीक्षक, सहा सहाय्यक पोलिस निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षक असे अधिकारी व पोलिस कर्मचारी पोलिस बंदोबस्त ठेवणार आहेत. दरम्यान अजनुज,अंबारवाडी, बावडा, पारगाव, केसुर्डी, घाटदरे, धावडवाडी, कण्हेरी, म्हावशी, अहिरे, मोर्वे, झगलवाडी, लोहोम, कर्नवडी, नायगाव, सांगवी, वडगाव, जवळे, कवठे, शिंदेवाडी, राजेवाडी, भाटघर, विंग, गुठाळे, मिरजे, अतिट, कोपर्डे, निंबोडी, बोरी, पाडळी, सुखेड, पिंपरे बुद्रुक, बावकलवाडी, मरिआईचीवाडी, पाडेगाव, बाळूपाटलाचीवाडी, खेड बुद्रुक, पिसाळवाडी, धनगरवाडी, अंदोरी, वाघोशी, भादवडे, शिवाजीनगर, शेखमिरेवाडी, लोणी, तोंडल, भोळी, भादे, वाठार बुद्रुक, शेडगेवाडी या पन्नास गावांत उद्या मतदान होत आहे.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com