
सातारा: प्रथा आणि परंपरेनुसार साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवासाठीची धांदल सर्वत्र सुरू झाली असून, यासाठीचा आराखडा सातारा पालिकेने पोलिस दलाच्या मदतीने तयार केला आहे. या आराखड्यानुसार पालिकेच्या मार्फतीने घरगुती, तसेच सार्वजनिक गणेशमूर्ती विसर्जनासाठी आवश्यक असणाऱ्या कृत्रिम तलावांच्या साफसफाईसह रस्ते डागडुजीच्या कामास प्राधान्य देण्यात येत आहे. यंदा बुधवार नाक्यासह गोडोली येथील कृत्रिम तळ्यात मोठ्या मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी मोठी क्रेन तैनात करण्यात येणार आहे.