

Voters queue up at polling centres in Satara; 15–20% turnout recorded within four hours.
Sakal
-हेमंत पवार
कऱ्हाड : सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड, वाई, फलटण, महाबळेश्वर, पाचगणी, मलकापुर, रहिमतपुर, म्हसवड आणि मेढा नगरपंचायतीची निवडणुकीसाठी आज मंगळवारी मतदान होणार होते. मात्र निवडणुक आयोगाच्या सुचनेनुसार फलटण आणि महाबळेश्वर पालिकांच्या निवडणुका आणि मलकापुरमधील दोन, कऱ्हाड नगपालिकातील एक प्रभाग वगळता अन्य सहा नगरपालिका आणि एका नगरपंचायतीसाठी आज सकाळी उत्साहात मतदानास प्रारंभ झाला. संवेदनशील ठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सकाळी साडेसात ते साडेअकरा या दरम्यान जिल्ह्यात सरासरी १५ ते २० टक्के मतदान झाले.