“Satara devotees bid farewell to Ganpati and Gauri with emotional chants of ‘Pudhchya Varshi Lavkar Ya’.”Sakal
सातारा
Ganesh Visarjan: ‘पुढच्या वर्षी लवकर या’चा जयघोष; सातारकरांचा गौरीसह गणपतीला वाजत- गाजत निरोप, विसर्जन करताना अनेक जण भावूक
“Ganesh Visarjan in Satara: यंदा पहिल्यांदाच क्रेनच्या मदतीने गोडोली येथील तलावात गणेश विसर्जन करण्यात येत होते. भक्तांनी मूर्तीची पूजा केल्यानंतर ती तराफ्यावर ठेवत तलावाच्या मध्यभागी क्रेनच्या मदतीने तराफा नेत मूर्तींचे विसर्जन पालिकेचे कर्मचारी करत होते.
सातारा: सात दिवस गणरायाची मनोभावे आराधना केल्यानंतर सातारकरांनी प्रथेप्रमाणे गौरीसह गणेशाला भक्तिपूर्ण वातावरणात पुढल्या वर्षी लवकर या... अशी भावनिक साद घालत निरोप दिला. यानिमित्ताने सातारा शहरासह परिसरातील विसर्जनस्थळे गणेशभक्तांच्या गर्दीने फुलून गेली होती.