esakal | साता-यात 'या' घटकांसाठी खूल्या केल्या बॅंका; नवा आदेश वाचा
sakal

बोलून बातमी शोधा

bank

साता-यात 'या' घटकांसाठी खूल्या केल्या बॅंका; नवा आदेश वाचा

sakal_logo
By
सिद्धार्थ लाटकर

सातारा : कोरोना ‍विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, सातारा जिल्हयात जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 मधील तरतूदीनुसार 31 मे च्या आदेशानुसार आठ जून पर्यंत सुधारित आदेश जारी केले आहेत. नव्या आदेशात शेतक-यांव्यतरिक्त अन्य घटकांसाठी बॅंका खूल्या ठेवल्या आहेत. (satara-shekhar-sinh-orders-to-reopen-bank-marathi-news)

नव्या आदेशानूसार सहकारी, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम PSU व खाजगी बँका व सहकारी बँका यांच्याशी संबंधित फक्त शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या अनुषंगाने पीक कर्जाचे, खते, बी-बियाणे, शेती औजारे यांची दुकाने, गॅस एजन्सीज, पेट्रोल पंप, मेडीकल यांचे रोख व्यवहार इ. कामकाज, एटीएममध्ये पैसे भरणे, चेक क्लिअरन्स, डाटा सेंटर ही कामे कार्यालयीन कामकाजादिवशी सकाळी 11 ते दुपारी 2 या कालावधीत चालू राहील.

हेही वाचा: स्मिता, कशी वागते हे लाेकांना माहितेय! आराेप हास्यास्पद

या बँकांचे उर्वरित सर्व कामकाज पूर्णपणे बंद राहील. या ठिकाणी गर्दी होणार नाही. तसेच कारोनाचे अनुषंगाने सोशल डिस्टन्सींगचे काटेकोरपणे पालन केले जाईल. याची जबाबदारी संबंधित बँक व्यवस्थापक यांची राहील.

loading image
go to top