गवे घुसले उसात; बिबट्या आला बाहेर! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gaur
गवे घुसले उसात; बिबट्या आला बाहेर!

गवे घुसले उसात; बिबट्या आला बाहेर!

शिराळा : शहरासह तालुक्यात बिबट्यापाठोपाठ (Leopard) आता गव्यांचा (Gaur) वावर वाढला आहे. आज दिवसभरात दोन ठिकाणी चक्क बारा गवे आढळून आले. सुजयनगर परिसरात तर ग्रामस्थांनी हुसकावल्यानंतर गवे उसाच्या फडात घुसले; तर अचानक उसातून बिबट्या बाहेर आला. बिबट्या अन् गवा एकाच वेळी या परिसरात वावरत असल्याने लोकांच्या शेतात जाताना भीतीचे वातावरण पसरले आहे. (Satara Marathi News)

आज सकाळी साडे सहा ते साडेनऊ पर्यंत जांभळेवाडीच्या नाळ व बामन उगळी परिसरात चार गवे ग्रामस्थांना दिसले. त्या ठिकाणाहून त्यांना लोकांनी सुजयनगर परिसरात हुसकावले. त्या गव्यांच्या मागावर ग्रामस्थ लक्ष ठेवून असताना गवे शिंदे यांच्या उसात घुसले; तर अचानक उसातून बिबट्या बाहेर आला. त्यामुळे लोकांची धावपळ उडाली. भागाईवाडी, भाटशिरगाव परिसरातही आज आठ गव्यांच्या कळपाचे लोकांना दर्शन झाले आहे. या दोन्ही ठिकाणी वनाधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली.

हेही वाचा: निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांकडून कोरोना नियमांची शहरात पायमल्ली

महाबळेश्‍वरच्या बाजारपेठेत रानगवा

महाबळेश्वर : पुणे, कोल्हापूर, सांगलीनंतर आता महाबळेश्वर शहराच्या मुख्य बाजारपेठेत रानगवा आल्याची घटना समोर आली आहे. काल (ता. ३) मध्यरात्री एक वाजता वाट चुकलेला रानगवा बाजारपेठेत आला. बस स्थानकापासून ते बाजारपेठेतून छत्रपती शिवाजी महाराज चौकातून खिंडीत आणि तेथून तो जंगलात परतला. सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नसली तरी, नागरिक आणि पर्यटकांत घबराटीचे वातावरण पसरले आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :SataraLeopard
loading image
go to top