Shivsena on Kangana Ranaut : साताऱ्यात शिवसेनेकडून कंगना राणावतचा निषेध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साताऱ्यात शिवसेनेकडून कंगना राणावतचा निषेध

साताऱ्यात शिवसेनेकडून कंगना राणावतचा निषेध

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा : देश स्‍वातंत्र्‍याविषयी वादग्रस्‍त विधान केलेल्‍या अभिनेत्री कंगना राणावत यांचा आज सातारा येथे शिवसैनिकांनी निषेध करत प्रतीकात्‍मक पुतळ्यास जोडे मारले. आंदोलनाच्‍या पार्श्वभूमीवर त्‍याठिकाणी बंदोबस्‍तास असणाऱ्या पोलिसांनी आंदोलकांच्‍या हातातून राणावत यांचा प्रतीकात्‍मक पुतळा ताब्‍यात घेत जप्‍त केला.

हेही वाचा: मोठी बातमी! गडचिरोलीत 26 नक्षलवाद्यांना कंठस्नान

एका खासगी वृत्तवाहिनीवरील मुलाखतीदरम्‍यान अभिनेत्ती कंगणा राणावत यांनी देश २०१४ मध्‍ये स्‍वतंत्र झाला असून १९४७ साली भिक मिळाली होती, असे वक्‍तव्‍य केले होते. या वादग्रस्‍त वक्‍तव्‍याचा देशभर निषेध होत असून ठिकठिकाणी राणावत यांच्‍याविरोधात देशद्रोहाचे गुन्‍हे नोंदविण्‍यात येत आहेत. याच अनुषंगाने आज सातारा येथील पोवईनाका परिसरात शिवसैनिकांनी आंदोलन करत राणावत यांचा निषेध केला तसेच त्‍यांच्‍या प्रतीकात्‍मक पुतळ्यास जोडे मारले.

हेही वाचा: ST STRIKE: विलीनीकरणाची मागणी मान्य होऊ शकत नाही - अनिल परब

या आंदोलनाच्‍या पार्‍श्‍वभुमीवर पोवईनाका येथे बंदोबस्‍तासाठी तैनात असणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांनी आंदोलकांच्‍या हातातून राणावत यांचा पुतळा हिसकावून घेत तो जप्‍त केला. यानंतर शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत राणावत यांचा निषेध करत केंद्र सरकारने त्‍यांना दिलेला पद्मश्री पुरस्‍कार माघारी घेण्‍याची मागणी केली. या आंदोलनात सातारा तसेच परिसरातील शिवसैनिक मोठ्या संख्‍येने सहभागी झाले होते.

loading image
go to top