Satara: एसटी कर्मचाऱ्यांचा कुटुंबीयांसह मोर्चा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एसटी कर्मचाऱ्यांचा कुटुंबीयांसह मोर्चा

कऱ्हाड : एसटी कर्मचाऱ्यांचा कुटुंबीयांसह मोर्चा

कऱ्हाड : येथील एसटी कर्मचाऱ्यांनी आज कुटुंबीयांसह तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी निर्णय झाल्याशिवाय माघार घेणार नसल्याचा निर्धार कर्मचाऱ्यांनी केली.

एसटी कर्मचाऱ्यांनी राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिगीकरण व्हावे, या मागणीसाठी आरपारची लढाई पुकारली आहे. त्याअंतर्गत एसटी आगारासमोर कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू असून बस स्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळच एसटी कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर ठिय्या मारला आहे. बंदला १०० टक्के प्रतिसाद मिळाला आहे. सध्या बस बंद आहेत. दरम्यान, आज एसटीच्या कर्मचाऱ्यांनी कुटुंबीयांसह तहसीलदार कार्यालयावर मोर्चा नेण्याचे आयोजन केले होते. मोर्चा सुरू झाल्यानंतर कर्मचारी दत्त चौकात पोचल्यावर पोलिसांनी तेथे मोर्चा अडवून केवळ शिष्टमंडळानेच निवेदन देण्यासाठी तहसीलदार कचेरीत जावे, असे आवाहन केले.

हेही वाचा: मि. ५६ इंच घाबरलेत! चीनबाबत परस्परविरोधी दाव्यांवरून राहुल गांधींची टीका

दरम्यान, आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांचे शिष्टमंडळाने तहसीलदार विजय पवार यांना निवेदन दिले. त्यानंतर मोर्चा दत्त चौकातून पुन्हा एसटी बस स्थानकाबाहेर नेण्यात आला. तेथे कोणत्याही परिस्थितीमध्ये आंदोलन मागे घेणार नाही, असा निर्धार कर्मचाऱ्यांनी केला. दरम्यान, आज येथील आंदोलनास विविध संघटनांनी पाठिंबा दिल्याचे सांगण्यात आले.

पाच दिवसांपासून प्रवाशांची पायपीट

एसटीच्या कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या काम बंद आंदोलनाला १०० टक्के प्रतिसाद मिळाला आहे. एकही एसटी बस आगारातून बाहेर जात नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. प्रवाशांना महामार्गासह अन्य मार्गावर बराच काळ वाहनांची वाट पाहात ताटकळावे लागले. ग्रामीण भागातील अनेक गावांतील लोकांना पायपीट करण्याशिवाय पर्यायच उरलेला नाही.

loading image
go to top