सातारा : जिल्ह्यातील १७ साखर कारखाने गाळपात सहभागी झाले असून, यापैकी सहकारी साखर कारखान्यांनी सर्वाधिक उसाचे गाळप करून साखर निर्मितीत आघाडी घेतली आहे. नऊ सहकारी साखर कारखान्यांनी आतापर्यंत १५ लाख ७१ हजार क्विंटल साखर पोत्यांची निर्मिती केली आहे. जिल्ह्यात १५ साखर कारखान्यांनी २९ लाख ५२ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केलेले आहे. त्यातून २५ लाख ३५ हजार क्विंटल साखर पोत्यांची निर्मिती झाली आहे. सरासरी ८.५९ टक्के साखर उतारा मिळालेला आहे. यावेळेस साखर उताऱ्यात खासगीसह सहकारी साखर कारखाने मागे पडल्याने साखर निर्मितीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.