कापसाच्या आगारात उसाला पसंती

phaltan
phaltan

आसू (जि. सातारा) : फलटण तालुक्‍यात आडसाली उसाच्या लागणीला वेग आला असून, काही ठिकाणी शेतकरी लागणीपूर्व मशागतीच्या कामात व्यस्त असल्याचे चित्र शिवारात दिसून येत आहे. एकेकाळी फलटण तालुका कापूस पिकाचे आगार होते. मात्र, पणन महासंघाच्या पडझडीनंतर या तालुक्‍यातील शेतकरी ऊस या नगदी पिकाकडे वळला आहे. 

तालुक्‍यात "श्रीराम'सह अन्य तीन साखर कारखाने नव्याने उभे राहिले. त्याबरोबर तालुक्‍यात धोम बलकवडीचे पाणीही आले. यामुळे दुष्काळी भागासह बागायती भागातील शेतकरी नगदी पीक म्हणून उसाला अधिक पसंती देत आहे. कोरोनामुळे मार्च महिन्यापासून लॉकडाउन असल्याने शेतकरी कोरोनाच्या धास्तीने शेताकडे फारसा फिरकला नाही. त्यामुळे मोकळ्या शेताच्या मशागती काही काळ थांबल्या होत्या. मात्र, एप्रिलपासून सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत शेतीच्या कामाला गती आली. मे महिन्याच्या दरम्यान ऊस लागणीसाठी नांगरट करून एकरी पाच ट्रेलर शेणखत घालून शेताची मशागत केली. 

गेल्यावर्षी तालुक्‍यात चांगला पाऊस झाल्याने छोटे तलाव, बोअरवेल, विहिरींमध्ये पाण्याची उपलब्धता चांगली आहे. नीरा उजव्या कालव्यातूनही उसासाठी पाणी सोडण्यात येणार असल्याची चर्चा आहे. त्याचबरोबर पावसाच्या अधूनमधून पडणाऱ्या सरींमुळे जुलै ते ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या आडसाली ऊस लागणीसह शेतात सरी काढणे, त्याची तोडणी आदी पूर्व तयारीच्या कामात शेतकरी व्यस्त आहे. प्रतिहेक्‍टरी ऊस उत्पादन वाढीसाठी योग्य बियाण्याची खरेदी करण्याची लगबग सुरू आहे. एकरी 5 हजार रुपयांचे बियाणे लागत असून, सरी तोडणी व लागण करण्याची मजुरी साधारणपणे 5 हजार रुपये असल्याचे शेतकरी सांगतात. काही शेतकरी घरगुती लागण करून बचतही करताना दिसत आहेत, तर काही शेतकरी मजुरांकडून लागण करून घेत आहेत. को- 86032, को- 265 या जातीच्या ऊस लागवडीकडे शेतकऱ्यांचा अधिक कल आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com