Satara : ऊसतोड कामगारही संपाच्या तयारीत

ऊस तोडणीसाठी प्रतिटन ४१० रुपयांची मागणी
Satara
Sataraesakal

सातारा : राज्यातील सर्व ऊसतोडणी कामगारांना तोडणीसाठी प्रतिटन ४१० रुपये देण्यात देण्याची मागणी ऊसतोडणी कामगारांच्या सर्व संघटनांनी राज्य सहकारी साखर कारखाना महासंघाकडे केली आहे. मात्र, हा दर देण्यास साखर महासंघाने असमर्थता दर्शविली. त्यामुळे या मागणीची येत्या दहा दिवसांत पूर्तता करावी, अन्यथा येत्या २५ डिसेंबरपासून ‘कोयता बंद’ आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य ऊसतोड कामगार मुकादम व वाहतूक संघटनेच्या सर्व संघटनांनी दिला आहे.

Satara
Career Tips : जाहिरात क्षेत्रात करिअर करायचे आहे? मग, ‘हे’ कोर्सेस तुम्ही करायलाच हवेत

आधिच दुष्काळी स्थितीमुळे यंदा ऊसाच्या क्षेत्रात मोठी घट झाल्याने हंगाम पुर्ण क्षमतेने चालणार नाही त्यातच ऊसतोड कामगारांनी कोयता बंदचे हत्यार उपसल्यास साखरकारखान्यांची मोठी कोंडी होणार आहे. ऊसतोड कामगारांची चालू ऊस गळीत हंगामातील ऊस तोडणी आणि भरणीसाठीच्या प्रचलित दरात ५५ टक्के वाढ करण्याची मागणी ऊसतोड कामगार संघटनांनी केली आहे. यावर पुण्यात साखर संकुलातील गुरुवारी ऊसतोड कामगार संघटनांची आणि कारखाना महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक झाली. यामध्ये ऊसतोड कामगार संघटनांच्या मागणीवर एकमत होऊ शकले नाही. त्यामुळे आजची ही बैठक फिसकटली.

राज्यातील ऊसतोडणी मजुरीचा प्रचलित दर सध्या २७३ रुपये १० पैसे इतका आहे. राज्य साखर महासंघाने राज्यातील ऊसतोड कामगारांना ऊस तोडणी दरात पहिल्यांदा सात टक्के वाढ दिली होती; परंतु या वाढीला कामगार संघटनांनी विरोध करत १०० वाढ देण्याची मागणी केली होती. मात्र, आम्ही याबाबत दर आठवड्याला बैठक घेत आहोत. त्यामुळे येत्या आठ दिवसांत पुन्हा एकदा बैठक घेऊ आणि या बैठकीत ऊस तोडणी दरवाढीबाबत सर्वांच्या सहमतीने मार्ग काढला जाईल.

- जयप्रकाश दांडेगावकर, अध्यक्ष, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ3

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com