Satara : आठशे टक्क्यांचे आमिष दाखवून शिक्षक दांपत्याची फसवणूक; पोलिस ठाण्यात तक्रार दाखल
कांबळे यांना फेसबुकवर ओरिजनल कॅपिटल टीम नावाची जाहिरात पाहायला मिळाली. त्यामध्ये गुंतवलेल्या रकमेवर ८०० टक्के नफा मिळणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे दीपाली कांबळे यांनी आपला भ्रमणध्वनी त्या जाहिरातीच्या कमेंटमध्ये दिला.
Teacher couple in Satara duped by scam promising 800% returns. Police investigation underway after complaint filed.Sakal
वडूज : गुंतवलेल्या रक्कम आठशे टक्के नफा मिळविण्याच्या आमिषाने येथील शिक्षक दांपत्याची ४१ लाख २० हजार ५५० रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार येथे घडला आहे. याबाबत दीपाली सचिन कांबळे (वय ३७, रा. वडूज, ता. खटाव) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.