Satara News : सातारा तालुक्यात खळबळ! 'लाचप्रकरणी मंडलाधिकारी जाळ्यात'; सातबारा उताऱ्यावर नोंदीसाठी एक लाखाची मागणी
Action against bribery : दहा गुंठ्यांच्या खरेदीची नोंद लावण्यासाठी संबंधित खरेदीदाराने खिंडवाडी (ता. सातारा) येथील तलाठ्यांकडे अर्ज केला होता.त्या आक्षेपावर सुनावणी घेऊन कोडोली मंडलाधिकाऱ्यांनी २२ मे रोजी दहा गुंठे जमिनीच्या नोंदीस स्थगिती दिली.
ACB officials in action after trapping a Satara revenue officer for demanding a ₹1 lakh bribe to make an entry in the 7/12 land record.Sakal
सातारा : फेरफार रद्द केलेल्या कामाची तसेच खरेदीखतानुसार सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी एक लाख रुपयांची लाच मागून ७५ हजार रुपये स्वीकारल्याप्रकरणी कोडोली येथील मंडलाधिकाऱ्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे.