ब्रेकिंग : सातारा जिल्ह्यात 'या' तालुक्यातील काेराेना बाधिताचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 जुलै 2020

सातारा जिल्ह्यात एकूण 13 हजार 240 जणांचे घशातील स्त्रावाचे नमुने घेण्यात आले. एक हजार 94 इतकी काेराेना बाधितांची संख्या झालेली आहे. आत्तापर्यंत एकूण 740 रुग्ण बरे झाले आहेत. जिल्ह्यात एकूण 46 जणांची मृत्यू झाला आहे.

सातारा : सातारा जिल्ह्यात आज (बुधवार) सकाळी 48 रुग्णांची वाढ झाल्याची माहिती समाेर येते ना येते ताेच एका बाधिताच्या मृत्यूची बातमी धडकल्याने चिंतेचे वातावरण पसरले आहे. दरम्यान एन.सी.एस, पुणे व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 298 नागरिकांचा अहवाल निगेटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्यिचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.

सातारा जिल्ह्यात आज (बुधवार) पहाटे कोरेगाव तालुक्यातील जांभ येथील 33 वर्षीय पुरुषाचा खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. तो कोरोना बाधित असल्याचे खासगी प्रयोगशाळेच्या अहवालानुसार स्पष्ट झाले आहे, अशीही माहिती डॉ. गडीकर यांनी दिली आहे.

दरम्यान सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधित व त्यांच्या मृत्यूच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मंगळवारी 14 नागरिक कोरोना बाधित निघाले, तर दोन कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याचबरोबर जिल्ह्यातील विविध रुग्णालयांत दाखल असलेल्या 20 जणांना कोरोनामुक्त झाल्याने घरी सोडण्यात आले.
 
कोरोना बाधितांची संख्या वाढत असताना जिल्ह्यात कोरोनामुक्तीचा वेगही चांगला आहे. मंगळवारी 20 रुग्णांना कोरोनामुक्त झाल्याने घरी सोडण्यात आले. त्यामध्ये कऱ्हाड तालुक्‍यातील सैदापूर येथील 29 वर्षीय पुरुष, सुपने येथील 37 वर्षीय महिला, तुळसण येथील 54 वर्षीय पुरुष, एक वर्षीय बालक, चचेगाव येथील 30 वर्षीय महिला, जावळी तालुक्‍यातील शिंदेवाडी येथील 39 वर्षीय महिला, म्हाते येथील 54 वर्षीय महिला व 62 वर्षीय पुरुष, केडांबे येथील 65 वर्षीय पुरुष, खटाव तालुक्‍यातील वाकळवाडी येथील 35 वर्षीय महिला व 27 वर्षीय पुरुष, म्हासुर्णे येथील 18 वर्षीय महिला, शिरसवाडी येथील 50 वर्षीय महिला, 40 व 56 वर्षीय पुरुष, दोन वर्षीय बालक, माण तालुक्‍यातील खोकडे येथील 34 वर्षीय महिला, सातारा तालुक्‍यातील सावली येथील 22 वर्षीय पुरुष, राजापुरी येथील 31 वर्षीय महिला व पाच वर्षीय बालिकेचा समावेश आहे. आज जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या 145 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून, 240 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. 

बुधवारची सकाळ या जिल्ह्यात 48 कोरोना बाधितांनी उजाडली

30 जुलैपर्यंत "जैसे थे' 

जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जिल्ह्यामध्ये 30 जूनपर्यंत लॉकडाउनचे निर्बंध जाहीर केले होते. त्याची मुदत आज संपली. त्यामुळे त्यांनी आज पुन्हा आदेश काढला आहे. त्यानुसार 30 जुलैपर्यंत जिल्ह्यात निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार जिल्ह्यामध्ये पुढील महिनाभर आहे तीच परिस्थिती राहणार आहे.

उदयनराजे शिवेंद्रसिंहराजे भेटले अन् माध्यमांनी उदयनराजेंना छेडले


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Till Today 46 Covid 19 Patient Died In Satara District