
सातारा : औद्योगिक विकास महामंडळाकडून (एमआयडीसी) सातारा आयटी पार्कच्या लिंब खिंडीतील नियोजित जागेचा ड्रोन सर्व्हे सुरू करण्यात आला आहे. ही जागा जिल्हाधिकाऱ्यांनी एमआयडीसीकडे हस्तांतरित केली असून, लवकरच आयटी पार्क उभारण्याबाबत नोटिफिकेशन निघेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे पाठपुरावा करून पुण्यासह बाहेरच्या जिल्ह्यातील मोठ्या आयटी कंपन्या साताऱ्यात आणण्यासाठी आमचा पाठपुरावा सुरू राहील, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज दिली.