
आनेवाडी : कण्हेर धरणावर आत्महत्या करायला गेलेल्या एका युवकाचा सातारा तालुका पोलिसांनी तत्परता दाखवून जीव वाचविला. याबाबत माहिती अशी, की सातारा तालुका पोलिस ठाण्याचे वाहतूक नियंत्रण शाखेचे अंमलदार सचिन घोरपडे व उमेश बगाडे हे दोघे बीट मार्शल ड्यूटीवर होते. दरम्यान, कण्हेर धरणावर एक युवक आत्महत्या करत असल्याचा कॉल ११२ वर आला.