Video पाहा : आईपणाची ऊब देणाऱ्या नर्स !

कोरोनात माणुसकीच्या बहुविध रूपांपैकी परिचारिकांचेही आगळं वेगळं रूपही मातृत्वासारखेच ऊबदार ठरते आहे.
Nurse
Nurse system

कऱ्हाड (जि. सातारा) : कऱ्हाडच्या कृष्णा हॉस्पिटलमधील (krishna hospital) परिचारिका (nurse) या लहान अर्भकांच्या (new born baby) आईचीही (mother) भूमिका पार पाडत आहेत. कोरोनाच्या विळख्यात सापडलेल्या 226 महिलांची प्रसूती (maternity) या हॉस्पिटलमध्ये झाली. प्रसूतीनंतर आईपासून दुरावलेल्या नवजात शिशुंना याच परिचारिका सांभाळत आहेत. त्यातून त्या शेकडो कुटुंबांच्याही दुवा घेत आहेत. आईत्वाच्या ऊबदार मायेची परिचारिकाव्दारे नवजातांची होणारी सेवा विशेष कौतुकाची ठरत आहे. (satara-trending-news-karad-nurse-feeds-new-born-baby-krishna-hospital)

कोणी त्यांना परिचारिका म्हणते, कोणी नर्स, तर कोणी कोरोनायोद्धा म्हणूनही त्यांचा सन्मान करतो. कोणी काहीही म्हटलं तरी रुग्णांची सेवा त्या इमानेइतबारे करण्याचे ईश्वरी कार्य करतात. कोरोनाच्या महामारीतही परिचारिका सामान्यांना दिलासा देत कोरोनामुक्तीसाठी पूल बनत आहेत. कोरोना काळात माणसांची अनेक रूपे समोर आली. अनेक जण वेगवगेळ्या पद्धतीने सेवा करत आहेत. त्यात डॉक्‍टर्स, नर्स, आरोग्य सेवक, स्वच्छता दूत दक्षपणे कार्य करत आहेत. कोरोनाच्या वाढत्या काळात कऱ्हाडच्या कृष्णा हॉस्पिटमध्ये परिचारिकांचे आईचे रूप पाहायला मिळत आहे.

Nurse
Krishna Factory Election : 'कृष्णा'चा अर्ज दाखल करण्यासाठी आता उमेदवार-सूचकांनाच प्रवेश

या हॉस्पिटमध्ये 226 कोरोनाबाधित मातांनी बालकांना जन्म दिला. जन्मानंतर कोरोना झाल्याने बालकांना आईपासून 10 दिवस बाजूला ठेवले जाते. त्या काळात बालकांचे संगोपन या परिचारिका करत आहेत. नवजात बालकाला त्याची तसूभरही कल्पना नसावी. मात्र, आईपणाची ऊब देणाऱ्या नर्स त्यांना जगाची ओळखही करून देत आहेत. आईसमच त्या नवजात बालकांचे सारेच सोपस्कार करत आहेत.

Nurse
पुणे- सातारा प्रवास हाेणार सुखकर; आठ किलोमीटरचे अंतर होणार कमी

कृष्णा हॉस्पिटलमध्ये रोटेशन पद्धतीने नर्स त्या बालकांच्या आई बनून वर्षभरापासून संगोपनाचे ममत्व देत आहेत. "कृष्णा'त मन हेलावणारं माणुसकीचं रूप म्हणून परिचारिकांच्या कामाकडे पाहावे लागेल. या परिचारिकांनी नवजात बालकांना आईची ऊब दिली. जन्म दिलेल्या बाळांना सांभाळण्याची जबाबदारीही त्या पार पाडत आहेत. कोविडचा ताण असतानाही महिला पूर्ण कोरोनामुक्त होत नाहीत, तोपर्यंत नवजात बालकांची जबाबदारी कृष्णा रुग्णालयाच्या व्यवस्थापनाने घेतली आहे. त्यासाठीचे मनुष्यबळही पुरवत आहेत. त्यामुळे कोरोनात माणुसकीच्या बहुविध रूपांपैकी परिचारिकांचेही आगळं वेगळं रूपही मातृत्वासारखेच ऊबदार ठरते आहे.

Nurse
महाबळेश्वर : ...तरच लॉकडाउनचे नियम शिथिल होतील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com