esakal | जीव जाऊ नये म्हणून आणू नका सांगताेय; डाॅक्टरांच्या आवाजात थरकाप

बोलून बातमी शोधा

Doctor
जीव जाऊ नये म्हणून आणू नका सांगताेय; डाॅक्टरांच्या आवाजात थरकाप
sakal_logo
By
सिद्धार्थ लाटकर

सातारा : ऑक्‍सिजनचा पूरवठा व्यवस्थित हाेईल का नाही याची शाश्वती नसल्याने सातारा जिल्ह्यातील विशेषतः ग्रामीण भागातील रुग्णालयांमध्ये बेड असूनही रुग्णांना दाखल करुन घेतले जात नाही. आज (रविवार) ई-सकाळच्या प्रस्तुत प्रतिनिधींनी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रुगणालयांना दूरध्वनी करुन ऑक्‍सिजन बेड उपलब्ध आहे का याची विचारणा केली. यामध्ये बहुतांश रुग्णालयांना बेड आहे परंतु ऑक्‍सिजनची उपलब्धता कमी जास्त हाेत असल्याने आज आम्ही गंभीर स्वरुपाचे रुग्ण दाखल करुन घेत नसल्याचे स्पष्ट केले.

सातारा जिल्ह्यात शनिवारी रात्री जिल्ह्यात 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या अहवालानूसार 1933 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. याबराेबरच 39 बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.

तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे : जावली 85 (4324), कराड 226 (14686), खंडाळा 145(5774), खटाव 261 (7838), कोरेगांव 148 (7889),माण 176 (5323), महाबळेश्वर 47 (3120), पाटण 81 (3770), फलटण 259 (11779), सातारा 346 (21505), वाई 140 (7154 ) व इतर 19 (457) असे आज अखेर एकूण 93619 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.

सातारकरांनाे! इथं मिळेल तुम्हांला ऑक्‍सिजन बेड

आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 3(95), कराड 4 (408), खंडाळा 1 (78) ,खटाव 6 (229), कोरेगांव 3 (222), माण 2 (126), महाबळेश्वर 0 (28), पाटण 2 (112), फलटण 5 (168), सातारा 6 (692), वाई 7 (171) , व इतर 0, असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 2329 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

सातारा जिल्ह्यातील विशेषतः ग्रामीण रुग्णालयांमध्ये ऑक्‍सिजन बेड उपलब्ध आहेत. परंतु रुग्णांना ऑक्‍सिजनचा तुटवडा भासू नये यासाठी नवे रुग्ण दाखल करुन घेतले जात नाही. या रुग्णांना सातारा अथवा क-हाड येथील रुग्णालयांत प्रयत्न करावेत असे सांगितले जात आहे. त्यामुळे रुग्णांचे नातेवाईक सातारा आणि क-हाड येथील नातेवाईकांना अथवा परिचितांना ऑक्‍सिजनचा बेड मिळेल का पहा असे सांगत आहेत. हे सांगताना अनेक वैद्यकीय अधिकारी यांच्या डाेळ्यातून अश्रु तर आवाजात थरकाप जाणवत हाेता.

सातारा : 1100 बेडची झाली उपलब्धता; जाणून घ्या काेठे आहे सुविधा

साता-यातील जंम्बाे काेविड रुग्णालयाच्या बाहेरील पाेर्चमध्ये आज (रविवार) सकाळपासून सुमारे 10 ते 13 रुग्णांना पाेर्टेबल ऑक्‍सिजन लावून त्यांची सेवा करण्याचे काम नातेवाईक, सामाजिक संस्थांच्या माध्यमातून सुरु हाेते. शहरातील बहुतांश रुग्णालयांमध्ये ऑक्‍सिजनचे बेड उपलब्ध नव्हते. या व्यतरिक्त व्हेंटिलेटर बेड तर काेठेच शिल्लक नव्हते अशी माहिती आपत्ती व्यवस्थापनाच्या संकेतस्थळावर नमूद हाेती.

काय सांगता! फोटोग्राफरच्या बंगल्यात राहतात Canon, Nikon, Epson; वाचा 'क्लिक'ची भन्नाट स्टोरी

माझे लग्न 26 एप्रिलला आहे, मला पळवून न्या.. तुमची पुष्पा, आय लव्ह यू