Satara Weather Update : साताऱ्यात 5 दिवस वादळी पाऊस; काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा कायम, हवामान विभागाचा अंदाज

मॉन्सूनने दक्षिण बंगालचा उपसागर, निकोबार बेटे आणि दक्षिण अंदमान समुद्रात प्रगती केली आहे, तर अंदमानात दाखल झालेला मॉन्सून यंदा ३१ मेपर्यंत केरळात दाखल
satara weather update next five day heavy rainfall expected imd alert
satara weather update next five day heavy rainfall expected imd alertSakal
Updated on

Satara News : मॉन्सून अंदमानात दाखल झाल्यानंतर सर्वांचे लक्ष मॉन्सूनच्या पावसाकडे लागले आहे. मात्र, राज्यात मागील १० ते १२ दिवसांपासून वेगवेगळ्या भागात वळवाच्या पावसाने हजेरी लावली आहे. सातारा जिल्ह्यात पुढील पाच दिवस काही ठिकाणी वादळी पाऊस, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

मॉन्सूनने दक्षिण बंगालचा उपसागर, निकोबार बेटे आणि दक्षिण अंदमान समुद्रात प्रगती केली आहे, तर अंदमानात दाखल झालेला मॉन्सून यंदा ३१ मेपर्यंत केरळात दाखल होण्याची शक्यता आहे; पण पूर्व मोसमी पावसाने राज्याला चांगलाच दणका दिला.

मागील १० ते १२ दिवसांपासून सातारा जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागांत वादळी पाऊस होत आहे. हवामान विभागाने आणखी पुढील पाच दिवस जिल्ह्यातील काही भागांत पावसाचा अंदाज दिला. हवामान विभागाने उद्या (मंगळवारी) साताऱ्यासह कऱ्हाड,

पाटण, महाबळेश्वर, खंडाळ्यामध्ये काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. बुधवारी आणि गुरुवारीही जिल्ह्यातील काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.

दरम्यान, वळवाच्या पावसाने हजेरी लावल्याने ग्रामीण भागात खरीप हंगामाच्या पूर्व मशागतीच्या कामांना सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी चांगल्या पावसाची प्रतीक्षा असली, तरी शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com