
Administration preparing ballot and control units for smooth conduct of Satara ZP elections.
Sakal
सातारा : जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या निवडणुकीसाठी प्रशासकीय पातळीवरून जोरदार तयारी सुरू आहे. मतदार यादीबरोबरच ईव्हीएम मशिनची जुळवाजुळव सुरू आहे. जिल्हा प्रशासनाने २६ लाख ६६ हजार २९६ मतदार (एक जुलै २०२५ ची मतदार यादी) नजरेसमोर ठेवून २८३८ मतदार केंद्रे गृहीत धरली आहेत. त्यासाठी जिल्ह्याला सहा हजार २४४ बॅलेट युनिट, तर ३१२२ कंट्रोल युनिटची आवश्यकता आहे. सध्या उपलब्ध मतदान यंत्रांची तपासणी सुरू आहे. यामध्ये काही बिघाड आढळल्यास अशी यंत्रे बदलून घेतली जाणार आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला आता मतदान यंत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.