
सातारा: महिगाव (सातारा) येथील एकाच कुटुंबातील दोघांना पोलिस खात्यात अधिकारी पदावर बढती मिळाली आहे. मुंबई येथे पोलिस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असलेले रणजित तानाजी पवार व त्यांच्या भावजय, सातारा पोलिस दलात उपनिरीक्षक असणाऱ्या सुवर्णा प्रकाश काटकर-पवार यांना सहाय्यक पोलिस निरीक्षक पदावर बढती मिळाली आहे. त्यांच्या पदोन्नतीबद्दल विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.