वाढलेल्या मतांची टिमकी नको; सत्यजिंतसिंह पाटणकर | Satara | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

satyjitsinh patankar
वाढलेल्या मतांची टिमकी नको; सत्यजिंतसिंह पाटणकर

वाढलेल्या मतांची टिमकी नको; सत्यजिंतसिंह पाटणकर

पाटण : जिल्हा बँकेसह नगरपंचायत निवडणुकीतील नामुष्की लपविण्यासाठी मतांच्या टक्केवारीची टिमकी गृहराज्यमंत्री वाजवत आहेत. तो जनतेची दिशाभूल करण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे. दोन्ही निवडणुकीतील पराभव मान्य करा. मरळीचे सरपंच मधुकर सुतार व चार सदस्य आमच्या व्यासपीठावर होते, त्याचा विसर गृहराज्यमंत्र्यांना पडला आहे, अशी टीका नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी केली.

हेही वाचा: शाळा सुरु होणार की बंदच राहणार! पालकमंत्री मंगळवारी घेणार निर्णय

पाटणमध्ये निवासस्थानी आज झालेल्या पत्रकार परिषदेत श्री. पाटणकर म्हणाले, ‘‘नगरपंचायतीत देसाई गटाने अपयश त्यांनी मान्य केले असते तर आम्हाला त्यांच्यावर बोलायची गरज नव्हती. एवढे होऊनही त्यावर टीकाटिप्पणी करत असतील तर जशास तसे उत्तर द्यायला तितकाच समर्थ आहे. मागील वेळी १४, तर यावेळी १५ सदस्य निवडून आले आहेत. तरीही आम्ही हुरळून गेलेलो नाही. केवळ दोनच प्रभागात स्थानिक कार्यकर्त्यांच्या गाफीलपणामुळे निसटता विजय मिळाला आहे.

त्यांना प्रभागनिहाय स्थानिक उमेदवार मिळाले नाहीत. इकडच्या तिकडच्या प्रभागातून उमेदवार आयात करावे लागले. जबाबदार राज्यमंत्री म्हणून भाजपच्या नावाने बोंबा मारायच्या आणि पाटणमध्ये मात्र भाजपच्या उमेदवाराला मदत करायची, ही शिवसेनेची निष्ठा सर्वांना कळाली आहे. नगरपंचायतीच्या निवडणुकीत लक्ष घातले नसल्याचा ते कांगावा करताहेत. मात्र, मतदानादिवशीही संस्था, कार्यकर्त्यांच्या निवासस्थानी त्यांनी का ठाण मांडलं होते, ते साऱ्यांनाच माहिती आहे. शिवसेनेचे जिल्हा व तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते सोबत घेऊन उमेदवारी अर्ज दाखल करणे, छाननी ते मतदान प्रक्रियेतही फौजफाटा येथे कशासाठी राबत होता, याचाही खुलासा त्यांनी करावा. सत्तांतराची भाषा, विजयाचे दावे होते. मात्र, अवघ्या दोन जागांवर त्यांना समाधान मानावे लागले.’’

हेही वाचा: शाळा-महाविद्यालये सुरु होणार की राहणार बंद? आज निर्णय

मतदानावेळी पाटणमध्ये पोलिसांचा पदाधिकारी, कार्यकर्ते, मतदारांवर दबाव आणूनही स्थानिक मतदारांनी तुमचा डाव उधळून लावला. अवघ्या दोन ठिकाणी गाफीलपणामुळे तुम्हाला निसटता विजय मिळाला, अन्यथा जिल्हा बँकेप्रमाणे तुमचा करेक्ट कार्यक्रम केला असता, त्यामुळे झालं हे मान्य करा.

Web Title: Satyjit Patankar Says Shambhuraje Desai Was Talking About Loass But Increase The Votes In Satara Babnk And Nagarpanchyaat Election In Satara

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top