esakal | कोरोनाचा नायनाट करण्यासाठी वडूजात सात दिवसांचा कर्फ्यू

बोलून बातमी शोधा

Public Curfew
कोरोनाचा नायनाट करण्यासाठी वडूजात सात दिवसांचा कर्फ्यू
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वडूज (सातारा) : शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागल्याने शुक्रवारी (ता. 23) ते शुक्रवारी (ता. 30) अखेर सात दिवस बंद ठेवत "जनता कर्फ्यू'चा निर्णय घेण्यात आला. येथील हुतात्मा स्मारकात बैठक झाली. त्यावेळी उपस्थित नगरसेवक, लोकप्रतिनिधींनी शहरात वाढत्या कोरोनाबाधितांच्या संख्येबाबत चिंता व्यक्त केली.

शहरात किमान सात दिवसांचा बंद पाळून जनता कर्फ्यू लागू करण्याची नागरिकांची मागणी असल्याचे म्हणणे मांडले. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला. बैठकीस तहसीलदार किरण जमदाडे, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. नीलेश देशमुख, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी माधव खांडेकर, नगराध्यक्ष सुनील गोडसे, वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली चव्हाण, सहायक पोलिस निरीक्षक मालोजीराव देशमुख, नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते.

शहरात सध्या 140 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. त्यामुळे उपविभागीय अधिकारी शैलेश सूर्यवंशी यांच्या आदेशानुसार वडूज शहर हे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यानुसार शहरात सात दिवस बंद पाळण्यात येणार आहे. या कालावधीत शहरातील दवाखाने, मेडिकल अशा वैद्यकीय सेवा सुरू राहणार आहेत. तर सकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत घरपोच दुधाचे वाटप सुरू राहणार आहेत. खासगी व शासकीय बॅंका तसेच अन्य व्यवसाय पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत. या कालावधीत मोकाट फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाईचा इशाराही देण्यात आला असून, नागरिकांनी सात दिवसांच्या "जनता कर्फ्यू'ला प्रतिसाद देऊन सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.

सावधान! नेरळे पुलावरुन प्रवास करताय? मग, थोडं थांबा.. पूल बनलाय धोकादायक

शहरात वाढत्या कोरोनाबाधित रुग्णसंख्येला अटकाव करण्यासाठी सात दिवसांचा "जनता कर्फ्यू' आवश्‍यक आहे. सद्या खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांची शेतीविषयक कामे सुरू आहेत. त्यामुळे या कालावधीत कृषी क्षेत्राशी निगडित कृषी सेवा केंद्रे, पाइपलाइन दुकाने, शेतकऱ्यांना डिझेल अशी सुविधा एक दिवसाआड सकाळी सात ते 11 या वेळेत द्यावी.

अनिल पवार, राज्य प्रवक्ते, स्वाभिमानी शेतकरी संघटना

Edited By : Balkrishna Madhale