
सातारारोड: पाणीपुरवठा योजनेच्या केलेल्या कामाचे थकीत बिल सरकारकडून वेळेत न मिळाल्याने हर्षल पाटील या युवकाने टोकाचे पाऊल उचलून स्वतःचे जीवन संपवल्याची घटना अत्यंत वेदनादायी आहे, असे नमूद करत या घटनेला सर्वस्वी सरकारचा नियोजनशून्य कारभार व बेजबाबदारपणा कारणीभूत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी केला आहे.