
यावेळी शिरवळ पोलिस स्टेशनला दोन्ही बाजूकडील नातेवाईकांनी गर्दी केल्याने शिरवळ पोलिस स्टेशन आवारात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.
मंगलाष्टका सुरु असतानाच पोलिस शिरले मंडपात अन् म्हणाले, सावधान!
शिरवळ (जि.सातारा) : खंडाळा तालुक्यातील एका गावात अल्पवयीन युवतीचा होणारा विवाह शिरवळ पोलिसांनी रोखला. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, वाई तालुक्यातील १६ वर्षीय एका अल्पवयीन मुलीचे लग्न सोलापूर जिल्ह्यातील एका २२ वर्षीय युवकाशी शिरवळ पोलीस स्टेशन हद्दीमधील एका गावात नातेवाईकांच्या घरासमोर गुरुवारी (ता. सात) करण्याचे ठरविले होते. लग्नाची तयारी संबंधित ठिकाणी जोरदार करण्यात आली होती.
सातारा जिल्ह्यातील बातम्या वाचा
यावेळी लग्नाची तयारी सुरू असताना संबंधित लग्न समारंभातील नियोजित वधू ही अल्पवयीन असून, तिचे वय अवघे १६ वर्षे असल्याची माहिती शिरवळ पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक उमेश हजारे यांना मिळाली. त्यानुसार पोलिस निरीक्षक उमेश हजारे यांनी तातडीने पोलिस उपनिरीक्षक वृषाली देसाई व पोलिस हवालदार नितीन महांगरे, महिला पोलिस हवालदार सुप्रिया जगदाळे यांना याबाबतच्या सूचना देत तातडीने लग्नसमारंभ ठिकाणी जाण्यास सांगितले. वधू-वरावर अक्षदा पडण्याची वेळ जवळ आली असताना शिरवळ पोलिस मंडपात दाखल झाले. संबंधित वधूची चौकशी करीत वयाचा पुरावा पाहिला. यावेळी संबंधित वधू ही सोळा वर्षाची असल्याचे निदर्शनास आले.
पर्यटकांनाे! महाबळेश्वर, पाचगणीला फिरायला निघालात? मग हे वाचाच
पोलिस उपनिरीक्षक वृषाली देसाई आणि शिरवळ पोलिसांनी दोन्हीकडील नातेवाईकांचे समुपदेशन केल्यानंतर विवाह समारंभ हा युवतीचे वय कायद्याप्रमाणे पूर्ण झाल्यानंतर करण्याचे नातेवाईकांनी कबूल केले. यावेळी शिरवळ पोलिस स्टेशनला दोन्ही बाजूकडील नातेवाईकांनी गर्दी केल्याने शिरवळ पोलिस स्टेशन आवारात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. शिरवळ पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया केल्यानंतर नातेवाईकांनी सुस्कारा सोडला.
बॉम्बेचे मुंबई झाले ना! औरंगाबादच्या नामांतरावर उदयनराजेंची स्पष्ट भूमिका
Web Title: Shirwal Police Stopped Marriage Minor Girl Wai Solapur Satara News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..