
नव्या पिढीतील युवकांच्या पुढाकाराने गावात सरपंच पदासाठी महिला तयार झाल्या. त्यांनी यंदा गावाला तसे कळविले देखील हाेते.
सातारा : सरपंच झाल्यानंतर संबंधित व्यक्तीचा मृत्यू हाेताे अशी चर्चा राहिलेल्या महाबळेश्वर (Mahableshwar) तालुक्यातील दुर्गम भागातील राजपुरी (Rajpuri) या गावात महिलेने सरपंचपदाची जबाबदारी स्विकारली आहे. सातारा जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये सरपंच आणि उपसरपंच पदाच्या निवडीसाठी विशेष सभा बाेलाविण्यास प्रारंभ झाला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने दिलेल्या वेळापत्रकानूसार महाबळेश्वर तालुक्यात सरपंच आणि उपसरपंच निवडण्याची प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. त्यानूसार गोडवली ग्रामपंचायत, भोसे ग्रामपंचायतीसह राजपुरी ग्रामपंचायतीच्या निवडी पुर्ण झाल्या आहेत. विशेष म्हणजे ज्या ग्रामपंचायतीचे (Grampanchayat) सरपंचपद घेतले की मृत्यू हाेताे अशा राजपुरी ग्रामपंचायतीवर महिला सरपंचाची निवड झाली आहे.
सरपंचपद नकाे रे बाबा ! का आमच्या गावाला बदनाम करालायस ?
याबाबत सकाळचे बातमीदार रविकांत बेलाेशे म्हणाले, राजपूरी ग्रामपंचायतीवर सत्वशिला राजपुरे, अशोक राजपुरे, किसन राजपुरे, रामचंद्र राजपुरे हे चाळीशीतील, पन्नाशीतील सदस्य सरपंच झाले. काही कालावधीनंतर त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे हे पद घेतल्यावर मृत्यू होतो अशी चर्चा गावात पसरली हाेती. त्यातूनच काही काळ येथील सरपंचपद रिक्त राहिल्याचे बाेलले गेले. खरंतर ही अंधश्रद्धा आहे निसर्ग नियमानूसार संबंधित सदस्यांचा मृत्यू झाला. नव्या पिढीतील युवकांच्या पुढाकाराने गावात सरपंच पदासाठी महिला तयार झाल्या. त्यांनी यंदा गावाला तसे कळविले देखील हाेते.
सरपंचपदाची निवडीत राजपूरी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शीतल विश्वास राजपुरे यांची निवड झाली आहे. या ग्रामपंचायतीवर उपसरपंच म्हणून शंकर आनंदा राजपुरे यांची निवड झाली आहे. याबराेबर तालुक्यातील भोसे ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची आरक्षित जागा रिक्त असल्याने फक्त उपसरपंचपदी अरुण गोळे यांची बिनविरोध निवडून झाली आहे. तसेच गोडवली ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मंगेश पवार तर उपसरपंचपदी विष्णु मालुसरे यांची निवड झाली आहे.
कायतर म्हणे.. आम्हाला आकाश द्या, चंद्र-सूर्य तारे द्या; सदाभाऊंनी शेतकऱ्यांना फटकारले
मातृभाषा संवर्धन करणे ही काळाची गरज : जयप्रकाश माने
सातबारा कोरा करून कुळधारक मालक घोषित करेपर्यंत आंदोलन; डॉ. भारत पाटणकरांचा निर्धार
कऱ्हाडातील बुधवारपेठेत एकावर कोयत्याने सपासप वार; थरारक हल्ल्यात एकजण जखमी