Uddhav Thackeray : वाढदिनीच उद्धव ठाकरेंना दणका; आणखी एका जिल्हाप्रमुखानं सोडली साथ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Eknath Shinde vs Uddhav Thackeray

अनेक पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करत असल्याने उद्धव ठाकरेंना धक्क्यावर धक्के बसत आहेत.

Uddhav Thackeray : वाढदिनीच उद्धव ठाकरेंना दणका; आणखी एका जिल्हाप्रमुखानं सोडली साथ

सातारा : राज्यातलं राजकीय वातावरण चांगलंय तापलंय. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत शिवसेनेच्या तब्बल 40 आमदारांनी बंडखोरी केल्यामुळं मोठी खळबळ उडाली. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर राज्यात सत्तांतर झालं. एकनाथ शिंदेंनी भाजपसोबत (BJP) मिळून राज्यात सत्ता स्थापन केली आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनले. शिंदे हे मुख्यमंत्री बनल्यावर त्यांना शिवसेनेचे नगरसेवक, नेते, पदाधिकारी, खासदार यांचा मोठा पाठिंबा मिळताना दिसून येत आहे.

त्यातच आता साताऱ्याचे शिवसेना (Shiv Sena) जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव (Chandrakant Jadhav) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना वाढदिवसादिवशी 'जय महाराष्ट्र' करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पाठिंबा दिलाय. मी शिवसेनेतच असून पक्ष सोडलेला नाही, असं सांगत एकनाथ शिंदे हे सातारा जिल्ह्याचे सुपुत्र असल्यानं विकासकामे होण्यासाठी मी त्यांना पाठिंबा देत असल्याचं जाधव यांनी सांगितलं.

Chandrakant Jadhav

Chandrakant Jadhav

हेही वाचा: एवढा मोठा त्याग करूनही पक्षाला माझी राज्यसभेला आठवण झाली नाही : क्षीरसागर

मागील आठवड्यात शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी शिंदे गटात प्रवेश केला असल्यानं उद्धव ठाकरेंना धक्क्यावर धक्के बसत आहेत. सातारा जिल्ह्यातील अनेक शिवसेना पदाधिकाऱ्यांनी त्यांना पाठिंबा दर्शवलाय. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना पाठिंबा दिल्याने उद्धव ठाकरेंच्या गटाला हा एक मोठा धक्का बसणार आहे. चंद्रकांत जाधव हे अनेक वर्षांपासून शिवसेनेत आहेत. त्यांनी उपजिल्हाप्रमुखपदही भूषविलं आहे. सध्या त्यांच्याकडं जिल्ह्याच्या पूर्व भागातील शिवसेनेचं जिल्हाप्रमुखपद होतं.

हेही वाचा: MP : भाजपनं मुस्लिम उमेदवारांवर दाखवला विश्वास, 25 प्रभागांत हिंदू उमेदवारांचा केला पराभव

Web Title: Shiv Sena District Chief Chandrakant Jadhav Joined The Eknath Shinde Group

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..