'चेष्टा, मस्करी सहन होत नाही, आता माझी सटकली'

Shiv Sena leader Sanjay Bhosale
Shiv Sena leader Sanjay Bhosaleesakal
Summary

गेंड्याच्या कातडीच्या निगरगट्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांना वाचविण्यासाठी प्रशासनाची केविलवाणी धडपड सुरुय.

दहिवडी (सातारा) : भ्रष्टाचाराच्या (Corruption) विरोधातील लढाईची लावलेली चेष्टा व मस्करी सहन होत नसल्याने आता माझी सटकली, असं म्हणत आजपासून कुठंही, कसंही व कधीही कोणतंही आंदोलन करताना प्रशासकीय अधिकाऱ्यांना थोबाडण्याचा व काळे फासण्याचा इशारा शिवसेनेचे (Shiv Sena) सातारा जिल्ह्याचे उपजिल्हाप्रमुख संजय भोसले (Sanjay Bhosale) यांनी दिला आहे.

संजय भोसले यांनी पत्रकात म्हटलंय, की चारा छावणीतील भ्रष्टाचाराविरोधात १५ ऑगस्ट २०२० पासून लोकशाही मार्गानं सुरु असलेल्या लढ्याची थट्टा संपूर्ण जिल्हा प्रशासनानं लावलीय. माझ्या तक्रारींबाबत वेळकाढूपणा, चालढकल करुन वारंवार मला नामोहरम करण्याचा प्रयत्न केला जात आहे; पण या सर्वांना पुरुन उरणार आहे. पोलिसांकडून (Police), महसूल विभागाकडून (Revenue Department) मला योग्य साथ मिळत नसल्यानं मी न्यायालयीन लढा देण्याचा निर्णय घेतला. न्यायालयानं गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. परंतु खोटी, बनावट कागदपत्रे सादर करुन दिशाभूल करण्याचा प्रयत्न पुन्हा करण्यात येत आहे.

Shiv Sena leader Sanjay Bhosale
शेतकरी 30 मिनिटांत 10 लाखांची रोकड घेऊन पोहोचला Mahindra Showroom मध्ये

या सर्व गेंड्याच्या कातडीच्या निगरगट्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांना वाचविण्यासाठी प्रशासनाची केविलवाणी धडपड सुरु आहे. या सर्वच प्रकाराला आळा बसावा म्हणून मी क्रांतिकारी पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. आता माझ्या रोषाला या सर्वांना सामोरे जावे लागणार असून यातूनही मला न्याय मिळाला नाही तर मी आत्मबलिदान करणार आहे, असा इशाराही भोसले यांनी दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com