
सातारा : कलंकित भ्रष्टाचारी मंत्र्यांची हकालपट्टी करा... अशी घोषणाबाजी करत उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेने आज महायुती सरकारमधील भ्रष्टाचारी मंत्री, तसेच त्यांचे वेगवेगळे राजकीय कारनाम्यांच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘जन आक्रोश मोर्चा’ काढून निषेध व्यक्त केला. या मोर्चाचे नेतृत्व शिवसेनेचे उपनेते नितीन बानगुडे-पाटील, शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रताप जाधव, शिवसेना जिल्हा प्रमुख यशवंत घाडगे, हर्षद कदम, संजय भोसले, महिला आघाडीच्या संघटिका छाया शिंदे यांनी केले. या भ्रष्टाचारी मंत्र्यांना तत्काळ घरी घालवा, अशी भावना या शिवसैनिकांनी व्यक्त केली.