Leopard cubs found inside a Satara apartment as mother leopard roams nearby; forest officials begin rescue operation.
शाहूनगर: अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या शाहूनगर परिसरातील गुरुकुल शाळेच्या मागील एका अपार्टमेंटच्या आवारात काल संध्याकाळी बिबट्याची दोन पिल्ले आढळली. वन विभागाने तातडीने पिल्लांना ताब्यात घेतले असले, तरी बिबट्याची मादी याच परिसरात दबा धरून बसल्याची भीती नागरिकांमध्ये पसरली आहे. प्रशासनाने त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी करत आंदोलनाचा इशारा दिला आहे.