esakal | रेशन व्यवस्थाही कोलमडली; सरकारच्या चर्चेनंतर फेडरेशनची भुमिका ठरणार महत्वाची
sakal

बोलून बातमी शोधा

Ration

रेशन व्यवस्थाही कोलमडली; सरकारच्या चर्चेनंतर फेडरेशनची भुमिका ठरणार महत्वाची

sakal_logo
By
सचिन शिंदे/सिद्धार्थ लाटकर

कऱ्हाड (जि. सातारा) : सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानदारांच्या मागण्यांकडे शासन दुर्लक्ष करत असल्याने जिल्ह्यातील दुकानदार कालपासून (ता. 1 मे) बेमुदत संपावर गेले आहेत. राज्यव्यापी संपात जिल्ह्यातील तब्बल 1794 दुकानदारांचा शंभर टक्के सहभाग आहे, अशी माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोकराव पाटील यांनी दिली. त्यामुळे सामान्यांना धान्य देणारी व्यवस्थाही कोलमडली आहे.

ऑल महाराष्ट्र फेअर प्राईज शॉप किपर्स फेडरेशनचे अध्यक्ष गजानन बाबर, विजय गुप्ता, नितीन पेंटर यांच्या नेतृत्वाखाली एक मेपासून राज्यातील सरकारमान्य स्वस्त दुकानदारांचा संप सुरू आहे. त्यात जिल्ह्यातील 1794 दुकानदारही 100 टक्के सहभागी झाले आहेत. त्याची माहिती श्री. पाटील यांनी दिली. ते म्हणाले, सरकारमान्य स्वस्त दुकानदारांच्या विविध मागण्या वर्षापासून प्रलंबित आहेत. त्याची पूर्तता होत नसल्याने राज्यव्यापी संप सुरू आहे.

जिल्ह्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदार त्यात एकजुटीने सहभागी झाले आहेत. त्यामुळे एकजुटीचा विजय होईल. सरकारने एक मागणी मान्य केली आहे. सरकार सोबत राज्य फेडरेशनची बोलणी सुरू आहे. मात्र, त्यांचा आदेश येईपर्यंत संप सुरू ठेवला जाणार आहे. शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार स्वस्त धान्य दुकानदार नेहमीच सरकारला सहकार्य करत आहेत. मात्र, अनेक वर्षांपासून स्वस्त धान्य दुकानदारांचे प्रश्न शासनस्तरावर मांडले जात आहेत. मात्र, ते तरीही स्वस्त धान्य दुकानदारांकडे होणारे दुर्लक्ष चुकीचे आहे. त्यांचे लक्ष मागण्यांकडे वेधण्यासाठी संप सुरू आहे.

'लाश वही है सिर्फ कफन बदला गया'

मानवतेला काळिमा फासणारी घटना..मयताच्या खिशातून काढली रोख रक्कम; प्रकार कॅमेरात कैद

सातारकरांनाे! पाणी जपून वापरा, अन्यथा...

loading image