भारीच की! सातारा जिल्ह्यात 60 कंपन्यांनी उभारले कोरोना केअर सेंटर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भारीच की! सातारा जिल्ह्यात 60 कंपन्यांनी उभारले कोरोना केअर सेंटर

नीरा व्हॅली असोसिएशनमधील गोदरेजसह एकूण 60 कंपन्यांनी एकत्र येऊन प्रशासनाला सहकार्य म्हणून व कोरोनाबाधितांच्या सेवेसाठी हे कोरोना सेंटर उभारले आहे. सेंटरच्या व्यवस्थापनाची संपूर्ण जबाबदारी सरकारी यंत्रणेची असेल. मात्र, यासाठी लागणारी आर्थिक व काही व्यवस्थापकीय मदत नीरा व्हॅली असोसिएशनमधील कंपन्या मिळून करणार आहेत, असे नीरा व्हॅलीचे अध्यक्ष अशोक जाधव यांनी सांगितले.

भारीच की! सातारा जिल्ह्यात 60 कंपन्यांनी उभारले कोरोना केअर सेंटर

खंडाळा (जि. सातारा) : तालुक्‍यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन गोदरेजसह शिरवळ औद्योगिक परिसरातील 60 कंपन्यांनी मिळून वडवाडी (ता. खंडाळा) येथे उभारलेले कोरोना केअर सेंटर हे अत्यावश्‍यक वेळी प्रशासनासाठी सहकार्य ठरणार असल्याचे प्रतिपादन खंडाळ्याचे तहसीलदार दशरथ काळे यांनी केले. 

नीरा व्हॅली मॅन्युफॅक्‍चरर्स असोसिएशन, सातारा जिल्हाधिकारी आणि तालुका स्थानिक प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने वडवाडी (ता. खंडाळा) येथे अभिनव विद्यालयात 100 बेडच्या कोरोना केअर सेंटरची उभारणी नुकतीच करण्यात आली.

कृष्णा, कोयना नदीकाठावर गणेश विसर्जनास बंदी, कऱ्हाड पालिकेची 'ही' पर्यावरणपूरक संकल्पना

या कोरोना केअर सेंटरचे उद्‌घाटन करताना काळे बोलत होते. या वेळी शिरवळ पोलिस ठाण्याचे निरीक्षक उमेश हजारे, नीरा व्हॅली असोशिएशनचे अध्यक्ष अशोक जाधव, गोदरेज लॉकम मोटर्स शिंदेवाडीचे व्यवस्थापक अभय पेंडसे, शिरवळ परिसरातील कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. 

महावितरण 875 व्हॉट्‌सअॅप ग्रुपव्दारे साधणार ग्राहकांशी संवाद

नीरा व्हॅली असोसिएशनमधील गोदरेजसह एकूण 60 कंपन्यांनी एकत्र येऊन प्रशासनाला सहकार्य म्हणून व कोरोनाबाधितांच्या सेवेसाठी हे कोरोना सेंटर उभारले आहे. सेंटरच्या व्यवस्थापनाची संपूर्ण जबाबदारी सरकारी यंत्रणेची असेल. मात्र, यासाठी लागणारी आर्थिक व काही व्यवस्थापकीय मदत नीरा व्हॅली असोसिएशनमधील कंपन्या मिळून करणार आहेत, असे नीरा व्हॅलीचे अध्यक्ष अशोक जाधव यांनी सांगितले. नीरा व्हॅलीचे सचिव पांडुरंग झंजले यांनी आभार मानले.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

loading image
go to top