esakal | लोकांमध्ये सामाजिक सलोख्याची भावना महत्त्वाची : प्रा. बंडा गोडसे
sakal

बोलून बातमी शोधा

satara

लोकांमध्ये सामाजिक सलोख्याची भावना महत्त्वाची : प्रा. बंडा गोडसे

sakal_logo
By
आयाज मुल्ला

वडूज : कोणताही धार्मिक, सामाजिक कार्यक्रम करताना लोकांमध्ये सामाजिक सलोख्याची भावना महत्त्वाची आहे, असे मत जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रा. बंडा गोडसे यांनी व्यक्त केले.

येथे नाभिक समाजाच्या वतीने आयोजित केलेल्या संत सेना महाराज पुण्यतिथी व माजी उपसरपंच परेश जाधव यांच्या वतीने नाभिक समाजास भेट दिलेल्या चांदीच्या पालखीचे लोकार्पण अशा संयुक्त कार्यक्रमात ते बोलत होते.

या वेळी हरणाई सूतगिरणीचे संस्थापक रणजितसिंह देशमुख, नियोजन समितीचे सदस्य अशोकराव गोडसे, माजी नगराध्यक्ष डॉ. महेश गुरव, खादी ग्रामोद्योगचे अध्यक्ष परेश जाधव, नगरसेवक शहाजीराजे गोडसे, विजय शिंदे, दीपक गोडसे, डॉ. महेश माने, अ‍ॅड. प्रल्हाद सावंत, सोमनाथ जाधव, शशिकांत पाटोळे, रणजित जाधव, अमित जाधव, आकाश जाधव, सोमनाथ काळे, राहुल सजगणे, सुभाष गुरव यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी बोलताना प्रा. गोडसे म्हणाले, ‘‘हल्ली चंगळवाद व भौतिक सुखाच्या आहारी लोक गेल्याने समाजातील लोकांमध्ये मतभेद वाढू लागले आहेत.

हेही वाचा: यवतमाळ : 'फल्ड लाईट’ने लखलखणार नेहरू स्टेडीयम

मतभेदाचे रूपांतर मनभेदात होऊ नये याची दक्षता त्या त्या समाजातील जबाबदार कार्यकर्त्यांनी घेण्याची गरज आहे. रामोशी समाजामध्ये एकीचे चांगले वातावरण आहे. त्याचा आदर्श नाभिक व इतर समाजांनी घ्यावा.’’ अशोकराव गोडसे यांनी विधायक कार्यक्रमाचे नियोजन केल्याबद्दल समाजबांधवांना धन्यवाद देऊन जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून समाजबांधवांना भरीव सहकार्य करण्याची ग्वाही दिली.

या वेळी प्रा. एम. के. क्षीरसागर, धनंजय क्षीरसागर यांचीही मनोगते झाली. राजेंद्र पवार यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. क्षीरसागर यांनी आभार मानले. या वेळी महाप्रसाद वाटप करण्यात आले.

loading image
go to top