संपाच्या तणावातून ST चालकाचा हृदयविकारानं मृत्यू; सरकार आणखी किती 'संतोष' जाण्याची वाट पाहणार? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ST Staff Strike

सध्या एसटी कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी संप सुरू आहे.

ST Staff Strike : संपाच्या तणावातून ST चालकाचा हृदयविकारानं मृत्यू

सातारा : एसटी विभागातील (Satara ST Division) मेढा आगारातील (Medha Depot) चालकाचा हृदय विकाराच्या झटक्यानं मृत्यू झालाय. संतोष वसंत शिंदे (वय 34, रा. आसगाव, ता. सातारा) असं त्या चालकाचं नाव आहे.

सध्या एसटी कर्मचाऱ्यांचा (ST Staff Strike) विविध मागण्यांसाठी संप सुरू आहे. शासनाकडून या संपावर अद्याप कोणताही तोडगा काढण्यात आलेला नाही. त्यामुळे सर्वच एसटी कर्मचारी प्रचंड तणावा खाली आहेत. त्यानुसार चालक संतोष शिंदे हे गेली चार ते पाच दिवसांपासून संपामुळे प्रचंड तणावाखाली होते. काल त्यांना हृदयविकाराचा झटका आला. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.

हेही वाचा: एसटी कर्मचाऱ्यांत तुंबळ हाणामारी; वाहकानं नियंत्रकाच्या डोक्यात घातला दगड

संतोष यांच्या पश्चात दोन मुले, पत्नी व आई-वडील असा परिवार आहे. आता आणखी किती संतोष जाण्याची राज्य सरकार वाट पाहत आहे, असं प्रश्न सामान्य जनतेला पडला असून एसटी महामंडळ तत्काळ शासनात विलीन करावे, अशी मागणी जोर धरु लागलीय. कालच संपकाळातील प्रवासी वाहतुकीच्‍या कारणावरुन सातारा आगारात (Satara Depot) कर्मचाऱ्यांच्‍या दोन गटात वाद झाला होता. वादात डोक्‍यास दगड लागल्‍याने सातारा आगारातील वाहतूक नियंत्रक अमित चिकणे हे जखमी झाले होते.

हेही वाचा: VIDEO : शेख महाराजांनंतर प्रवचन देताना आणखी एका महाराजांना हृदयविकाराचा झटका

loading image
go to top