मायणी : विद्यार्थ्यांना ना खिचडी ना स्लाइस! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

students
मायणी : विद्यार्थ्यांना ना खिचडी ना स्लाइस!

मायणी : विद्यार्थ्यांना ना खिचडी ना स्लाइस!

मायणी : विद्यार्थ्यांना खिचडीऐवजी पोषणमूल्ये असणाऱ्या स्लाइस देण्याचे शिक्षण विभागाने जाहीर केल्यानंतर सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत नोव्हेंबरमध्येच त्याचे वितरण करण्यात आले. मग, साताऱ्यावरच अन्याय का? असा सवाल शालेय व्यवस्थापनसह विविध स्तरातून करण्यात येत आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव व प्रभाव कमी होताच शासनाने मार्गदर्शक सूचनांनुसार शाळा सुरू केल्या. संसर्ग टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून पोषण आहाराची खिचडी बंद करून विद्यार्थ्यांना न्युट्रिटीव्ह (पोषक)(Nutritional) स्लाइस देण्याचा निर्णय घेण्यात आला.

हेही वाचा: महापुरुषांच्या पुतळे निर्मितीचे बेळगाव बनतंय ‘हब’

मुलांना अधिकाधिक पोषणमूल्ये मिळावीत यासाठी तांदूळ, नाचणी, बाजरी, ज्वारी, सोयाबीन यांसह लोहयुक्त गव्हाचे पीठ, पिठी साखर, खाद्यतेल, मलई विरहित (स्किम्ड) दूध आणि इतर पोषक घटक वापरून ती न्युट्रिटीव्ह स्लाईस बनविण्यात येत आहेत. आकर्षक पद्धतीने पाकिटात सीलबंद करून ते महापालिका, पालिका, जिल्हा परिषद शाळा तसेच शासनमान्य अनुदानित शाळांतील विद्यार्थ्यांना वितरित करण्यात येत आहे. स्लाइसचे कंत्राट जालना येथील दिव्या एसआरजे फुड्स एलएलपी या संस्थेला देण्यात आले आहे. त्यांनी सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांतील शाळांत सप्टेंबर, ऑक्टोबरमध्येच स्लाइस पोचविल्या. नोव्हेंबरमध्ये त्याचे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वितरण करण्यात आले. मात्र, सातारा जिल्ह्यात अद्याप दोन-तीन तालुके वगळता स्लाइस मिळाल्या नाहीत.(satara news)

हेही वाचा: पुणे : चंदन तस्करी प्रकरणात एकास पकडले

त्यामुळे मुलांना पोषण आहारापासून वंचित राहावे लागत आहे. परिणामी, हजारो मुले कुपोषित राहण्याची चिंता व्यक्त होत आहे. विद्यार्थ्यांच्या दैनंदिन उपस्थितीवरही दुष्परिणाम होत आहे. त्यामुळे सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांत स्लाइस दिल्या. मग, साताऱ्यावरच अन्याय का? असा सवाल पालक, शिक्षणप्रेमी नागरिक व शाळा व्यवस्थापन करीत आहे.

सातारा जिल्ह्यात कोरेगाव, महाबळेश्वर आणि वाई तालुक्यांत न्युट्रिटीव्ह स्लाइस वितरण झाले आहे. शासनस्तरावर निर्णय होईल, तसे अन्य तालुक्यांतही वितरण होईल.

-सविता पाटील, लेखाधिकारी, पोषण आहार योजना

सातारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना पोषण आहार योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी सर्वांनी पाठपुरावा करणे आवश्यक आहे.

-एस. डी. खैरमोडे, पदाधिकारी, जिल्हा मुख्याध्यापक संघ

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top