

Sugar Mill Opening
esakal
कऱ्हाड : साखर कारखाने १५ ऑक्टोबरपुर्वी सुरू न करण्यासंदर्भात माजी खासदार राजू शेट्टी यांनी केलेली मागणी रास्त आहे. सध्या कारखाने सुरु केल्यास ऊसाचे वजन भरत नाही. टनाला दिड टक्के उतारा कमी येत असेल तर उसाचे साखरेचे प्रमाणही कमी आहे. त्यामुळे शेतकरी व कारखान्यांचे नुकसान आहे. त्यामुळे साखर बाजारात आणण्यासाठी कारखाने सुरू करण्याचा निर्णय झालाच तर टनाला ७५० रुपये सरकारने कारखान्याला द्यावेत, अशी मागणी असुन त्याचा सरकारकडे आम्ही पाठपुरावा करत आहोत अशी माहिती साताऱ्याचे पालकमंत्री आणि पर्यटनमंत्री शंभुराज देसाई यांनी दिली.
साखर कारखाने १५ ऑक्टोंबरला सुरू करण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यासंदर्भात चर्चा करणार आहोत. सध्या बाजारात साखरेची टंचाई आहे. कोणत्याच कारखान्याकडे साखरेचा साठा नाही, अशी स्थिती आहे. साखरेचे दर नियंत्रित ठेवण्यासाठी लवकर साखर कारखाने सुरू करायला सांगितले आहेत.
मात्र साखर कारखान्याकडे सध्या गाळपास येणाऱ्या उसाची दिड टक्के उतारा कमी लागत आहे. त्यामुळे टनाला शेतकरी व कारखान्याला ७५० रुपयांचे नुकसान होणार आहे. त्यासंदर्भात मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, खासदार नितीन पाटील यांची यासंदर्भात चर्चा होऊन कारखान्याचे नुकसान सरकारने टनाला ७५० रुपये द्यावेत अशी मागणी कारखानदारांची असून या मागणीचा पाठपुरावा मंत्री म्हणून सरकारकडे करत आहोत.
सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड, पाटण, कोरेगाव व जावळी तालुक्यांचा दुष्काळग्रस्त तालुक्यांत समावेश करण्यासंदर्भातील मागणी मंत्रीमंडळ बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांच्याकडे केली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधित तालुक्यांचा समावेश करण्यासंदर्भातील निर्देश प्रशासनाला दिले आहेत. येत्या मंगळवारच्या बैठकीत त्यावर निर्णय होईल अशी माहिती पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी आज दिली. मंत्रीमंडळाने दुष्काळाच्या उपाययोजना करण्यासंदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या उपसमितीला दिलेले आहेत. या समितीमार्फत जिल्ह्यातील वगळलेल्या तालुक्यांचा समावेश करण्यासंदर्भातील निर्णय घेतला जाईल असेही त्यांनी सांगीतले.
मिनाक्षी शिंदे यांच्यावर सुषमा अंधारे यांना सुपारीसाठी पैसे दिल्याचा आरोप केला आहे. या प्रश्नांवर मंत्री देसाई म्हणाले, त्यासंदर्भातील काही पुरावा अंधारे यांच्याकडे असेल तर त्यांनी तो पोलिसांना द्यावा. हवेत तीर मारायची उबाठाच्या सर्व नेत्यांना सवय आहे. मिनाक्षी शिंदे यांनी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्याची माझी तयारी असल्याचे उघडपणे सांगितले आहे. त्यामुळे कोणत्या गोष्टीचे राजकीय भांडवल करायचे उबाठाचे नेते सोडत नाहीत. त्यांना जनतेने नाकारले आहे. अशा गोष्टीतून काही सहानुभूती मिळते का याचा केविलवाणा प्रयत्न उबाठाच्या नेत्यांकडून सुरू आहे. त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.