

Sugarcane crushing begins across Satara district as factories start operations for the new season.
Sakal
काशीळ: यंदाचा ऊस गाळप हंगाम एक नोव्हेंबरपासून सुरू करण्याबाबत शासनाचे आदेश आहेत. मात्र, सातत्याने बदलत्या नैसर्गिक परिस्थितीमुळे निर्माण होणारी आव्हाने लक्षात घेऊन, जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखान्यांनी ऊस गाळपास प्रारंभही केला आहे. याची दखल घेत साखर आयुक्तालयाने जिल्ह्यातील तीन कारखान्यांना नोटीस बजावली आहे. यामध्ये यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना, धावरवाडी (ता. कऱ्हाड) येथील जयवंत शुगर्स, गोपुज (ता. खटाव) येथील ग्रीन पॉवर शुगर्स या तीन कारखान्यांचा समावेश आहे.