ऊस नको; पण टोळीवाले आवरा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sugar Factory

ऊस नको; पण टोळीवाले आवरा!

कोरेगाव: जरंडेश्वर शुगर मिलच्या ऊसतोडणी टोळ्यांनी हंगामाच्या अखेरच्या टप्प्यात अडलेल्या शेतकऱ्यांना खिंडीत गाठून भरमसाट पैसे उकळत ऊस पेटवून तोडणीवर भर दिला आहे. परिणामी, उसाचे अल्प का होइना वजन घटणार आहेच शिवाय दरही कमी मिळणार आहे. तरीही शेतकरी केवळ आपला ऊस तोडून जावा, या हेतूने निमूटपणे ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार’ सहन करत ‘ऊस नको; पण टोळीवाले आवरा’असे म्हणू लागले आहेत.

कोरेगाव तालुक्यात दरवर्षीप्रमाणे यंदाही सुमारे दहा लाख मेट्रिक टन ऊस गाळपासाठी सज्ज होता. या ऊस गाळपासाठी तालुक्यात हक्काचा जरंडेश्वर शुगर मिल हा कारखाना आहे. तालुक्यातील बहुतांश गावे ही किसन वीर साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात आहेत. तालुक्यातून शेंद्रेतील (ता. सातारा) ‘अजिंक्यतारा’ व शिरवडे (ता. कऱ्हाड) येथील ‘सह्याद्री’ तसेच अनेक खासगी साखर कारखाने ऊस गाळपासाठी मोठ्या प्रमाणात नेतात. मात्र, यंदा दरवर्षीपेक्षा उसाची उपलब्धता अधिक असताना ‘किसन वीर’सह ‘खंडाळा’ कारखाना आणि ‘प्रतापगड’ कारखाने बंद राहिल्याने तेथील ऊस गाळण्याची जबाबदारी ‘जरंडेश्वर’वर येऊन पडली. ‘अजिंक्यतारा’ व ‘सह्याद्री’ कारखान्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील ऊस मुबलक उपलब्ध होता. जिल्ह्यातील खासगी कारखान्यांनाही त्यांच्या भागात ऊस उपलब्ध होता. त्यामुळे ‘जरंडेश्वर’ला कोरेगाव तालुक्यासह वाई, खंडाळा, जावळी व सातारा तालुक्यातीलही काही प्रमाणात ऊस गाळपाची जबाबदारी पार पाडावी लागली. मुळातच गाळप क्षमताही प्रतिदिन दहा हजार मेट्रिक टनांपर्यंत वाढवली असल्यामुळे ‘जरंडेश्वर’ने ही जबाबदारी यशस्वी करत आणली आहे. ‘जरंडेश्वर’ने आतापर्यंत १८ लाख मेट्रिक टनांवर उसाचे गाळप केलेले आहे. मात्र, ही जबाबदारी पार पाडताना त्यांच्या ऊस तोडणी टोळ्यांनी

सोसायट्यांकडून ऊस बिलांवर कात्री

यंदा ‘जरंडेश्वर’ने उसाची बिलेही उशिरा काढली. बिले उशिरा निघत असल्याने बऱ्याच शेतकऱ्यांची सोसायटीची कर्जे भरणे आणि इतर खर्चाचा मेळ घालताना धावपळ झाली. विकास सेवा सोसायट्यांनी शेतकऱ्यांची अडचण लक्षात न घेता बिलांवर कात्री मारली. त्यामुळे अनेक शेतकरी हतबल झाले.

साखर कारखान्यांकडून यंदा उसाची बिले उशिरा निघत गेली. परिणामी, शेतकऱ्यांसमोर दैनंदिन खर्चाची जुळवाजुळव करताना व विकास सेवा सोसायट्यांची कर्जे भरताना खूपच धावपळ झाली. अशा वेळी शेतकऱ्यांच्या अडचणी सोसायट्यांनी समजून घ्यायला हव्या होत्या. मात्र, तसे झाले नाही.

- काकासाहेब बर्गे, ऊस उत्पादक शेतकरी, कोरेगाव

Web Title: Sugarcane Harvesting Gangs Season

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top