कोरेगाव : स्वच्छ सर्वेक्षण अभियानात गैरव्यवहार?

कोरेगाव : स्वच्छ सर्वेक्षण अभियानात गैरव्यवहार?

कोरेगाव (जि. सातारा) : कोरेगाव नगरपंचायतीने 2019-20 मध्ये राबवलेल्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानामध्ये (Swachh Sarveshan Abhiyan) आर्थिक अनियमितता व गैरव्यवहार झाल्याचा आरोप डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलितमित्र समाज भूषण संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश येवले यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केला आहे. या सर्व बाबींचे शासकीय लेखापरीक्षण करावे आणि सखोल चौकशी करून या प्रकरणाशी संबंधित दोषींवर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
 
यासंदर्भात निवेदनात श्री. येवले यांनी म्हटले आहे, की सन 2019-20 मधील स्वच्छ सर्वेक्षण अभियानामध्ये कोरेगाव नगरपंचायतीने जनजागृतीसाठी पथनाट्य, भारूड व वासुदेव फेरीसारखे उपक्रम राबवले. या उपक्रमाच्या निविदा मागवण्यापासून त्या मंजूर करण्यापर्यंतचा कालावधी, मंजूर निविदाधारकास पुरवठा आदेश देण्यापासून कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर त्याचे देयक मंजूर करून ते अदा करण्यापर्यंत राबवलेली संपूर्ण प्रक्रिया संशयास्पद आहे. जनजागृतीसाठी शहरात ठिकठिकाणी फ्लेक्‍स बोर्ड लावण्यासाठी मागवलेल्या निविदांपैकी मंजूर झालेल्या निविदांना राबवलेली देयक अदा करण्यापर्यंतची प्रक्रियाही संशयास्पद आहे. त्याच्या प्रमाणकावर तारीख व रक्कम नमूद नाही. 

सर्व तारखांमध्ये तफावत असून, त्यात संगनमताने आर्थिक तडजोड झाल्याचे दिसून येत आहे. 2019 मध्ये शहरातील सार्वजनिक शौचालयांसह विविध ठिकाणच्या भिंतींवर "स्वच्छ सर्वेक्षण 2019' असे रंगवले होते. त्यानंतर त्याच ठिकाणी केवळ "स्वच्छ सर्वेक्षण 2020' असे रंगवले आहे. सार्वजनिक स्वच्छतागृहांची दुरुस्ती व रंगकामाच्या कामामध्येही अनियमितता असून, देयक अदा करण्यापर्यंत राबवलेली प्रक्रिया संशयास्पद आहे. 

माहिती अधिकाराची हेटाळणी? 

कोरेगाव नगरपंचायतीची स्थापना झाल्यापासून कार्यालयामध्ये माहिती अधिकाराबाबतचा फलक, तसेच जनमाहिती अधिकारी, अपिलिय अधिकारी यांचे पदनाम दर्शवणारा फलक नाही. माहिती अधिकार कायद्यांतर्गत मागितलेली माहिती, दस्तऐवजावर शिक्का नाही अथवा त्यावर जनमाहिती अधिकाऱ्याची स्वाक्षरी नाही. असा मनमानी व बेजबाबदार कारभार करत संबंधितांकडून माहिती अधिकार कायद्याची हेटाळणी सुरू असल्याचा आरोप सुरेश येवले यांनी केला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com