
मध्यंतरी महाविकास आघाडीतील मंत्र्यांनी वीजबिल माफ करण्याची घोषणा केली होती; पण या सर्वांकडे दुर्लक्ष करून घरगुती व शेती पंपाच्या बिलांची वसुली सुरू आहे. वीज वितरण कंपनीने तातडीने वसुली व कनेक्शन तोडणी थांबवावे.
सातारा : कोरोना काळात आलेल्या वाढीव दराच्या घरगुती व शेती पंपाच्या बिलांची महावितरणने धडक वसुली मोहीम राबली असून, अनेकांची वीज कनेक्शन तोडण्यात येत आहेत. महावितरण कंपनीची ही हुकूमशाही बंद करावी, अन्यथा 24 फेब्रुवारीला नागठाणे येथे आक्रोश मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने निवेदनाद्वारे दिला आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.
स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांच्या नेतृत्वाखालील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचे निवेदन दिले. या निवेदनात त्यांनी म्हटले, की स्वाभिमानी शेतकरी संघटनेने वारंवार निवेदने देऊनही वीज वितरण कंपनीने कोरोना काळातील वीजबिलांची वसुली सुरू केली आहे. वीजबिले न भरलेल्यांची हुकूमशाही पद्धतीने कनेक्शन तोडण्यात येत आहेत.
मध्यंतरी महाविकास आघाडीतील मंत्र्यांनी वीजबिल माफ करण्याची घोषणा केली होती; पण या सर्वांकडे दुर्लक्ष करून घरगुती व शेती पंपाच्या बिलांची वसुली सुरू आहे. वीज वितरण कंपनीने तातडीने वसुली व कनेक्शन तोडणी थांबवावे. अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना 24 फेब्रुवारीला नागठाणे येथे आक्रोश मोर्चा काढणार आहे. मागण्या मान्य होईपर्यंत नागठाणे येथील सासपडे रस्त्यावरील कमानीजवळ बेमुदत रास्ता रोको आंदोलन करणार आहे, असा इशारा देण्यात आला आहे. या वेळी अर्जुनराव साळुंखे, रमेश पिसाळ, ऍड. विजय चव्हाण, महादेव डोंगरे, जनार्दन आवारे, हेमंत खरात, दत्तात्रेय पाटील, उपस्थित होते. या निवेदनाची प्रत त्यांनी पोलिस अधीक्षक व महावितरण कार्यालयातही दिले आहे.
कोरोनाच्या रुग्णांत झपाट्याने वाढ; दहिवडी सलग तीन दिवस बंद
बाबो! हणबरवाडीत चोरट्याने पळवले चिंचेचे झाड; उंब्रज पोलिस ठाण्यात मालकाची तक्रार
गर्ल्स हायस्कूल भरतेय रस्त्यावर; नागरिकांतून संताप
सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोलाल तर देशद्रोही ठराल
लग्न मंडपात पोहचले पोलिस, साऱ्यांची तारांबळ; विवाहसोहळ्यावर कारवाई पाच गुन्हे दाखल