esakal | गर्ल्स हायस्कूल भरतेय रस्त्यावर; नागरिकांतून संताप 
sakal

बोलून बातमी शोधा

गर्ल्स हायस्कूल भरतेय रस्त्यावर; नागरिकांतून संताप 

गुरुवारी (ता. 18) दुपारी अचानक आलेल्या पावसामुळे उघड्यावर असलेल्या शाळेच्या साहित्याच्या संरक्षणासाठी ताडपत्री टाकण्यात आली. मात्र, तरीही काही साहित्य भिजल्याने मोठे नुकसान झाले आहे

गर्ल्स हायस्कूल भरतेय रस्त्यावर; नागरिकांतून संताप 

sakal_logo
By
भद्रेश भाटे

वाई (जि. सातारा) : इमारतीच्या अभावामुळे येथील गर्ल्स हायस्कूलमधील विद्यार्थिनीच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर झाला आहे. मागील चार दिवसांपासून शाळेचे वर्ग रस्त्यावर, तसेच उघड्यावर भरत आहेत. तोंडावर परीक्षा असल्याने अशा परिस्थितीत विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. मुलींच्या शिक्षणाची हेळसांड होत असल्याने पालक हवालदिल झाले असून, वाईकरांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
 
रविवार पेठ येथील सि.स.नं. 1486 येथील वाई ब्राह्मो समाज मंडळाच्या इमारतीच्या जागेत श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे गर्ल्स हायस्कूल आहे. संस्थेने ही जागा भाडेतत्त्वावर घेतली असून, अद्याप भाडेकरार बाकी आहे. असे असताना ब्राह्मो समाज मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी ही इमारत पाडली. कोणतीही पूर्वकल्पना न देता रविवारी (ता. 14) या सुटीच्या दिवशी शाळेत प्रवेश करून मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी शाळा पाडल्याचा आरोप संस्थेने केला. शाळेची इमारत धोकादायक झाल्याने पाडावी लागली, असा खुलासा मंडळाच्या अध्यक्षा मीनल साबळे यांनी केला आहे.

दरम्यान, शाळेच्या प्रवेशद्वाराला टाळे ठोकण्यात आल्याने सोमवारी विद्यार्थिनींवर रस्त्यावरच भर उन्हात प्रार्थना म्हणण्याची वेळ आली. हायस्कूलचे वर्ग कुठे भरवायचे असा प्रश्न मुख्याध्यापिकांना पडला आहे. मागील चार दिवसांपासून शाळेचे वर्ग उघड्यावर भरत आहेत. गुरुवारी (ता. 18) दुपारी अचानक आलेल्या पावसामुळे उघड्यावर असलेल्या शाळेच्या साहित्याच्या संरक्षणासाठी ताडपत्री टाकण्यात आली. मात्र, तरीही काही साहित्य भिजल्याने मोठे नुकसान झाले आहे. 

साताऱ्यात अवकाळीच्या तडाख्यात पिके जमीनदोस्त; रब्बीतील पिकांचे अतोनात नुकसान

बाबो! हणबरवाडीत चोरट्याने पळवले चिंचेचे झाड; उंब्रज पोलिस ठाण्यात मालकाची तक्रार

कोरोनाच्या रुग्णांत झपाट्याने वाढ; सातारा जिल्ह्यातील हे गाव सलग तीन दिवस राहणार बंद

शेतजमीन विक्री करुन पैसे देत नसल्याने मित्रांच्या मदतीने मुलाने केला वडिलांचा खून

स्वामी विवेकानंद संस्थेची ती शाळा पाडण्याचे ब्राह्म समाजाकडून स्पष्टीकरण

Edited By : Siddharth Latkar

loading image